नवी दिल्ली, 11 जुलै : मोफत रेशन मिळणाऱ्या कुटुंबांसांठी आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत अनेक राज्यांना तांदूळ व गहू विक्री करणं काही काळापूर्वी बंद केलं होतं. सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम गरीबांना मोफत धान्य देणाऱ्या राज्यांवर झाला. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यांना केंद्रीय पूलमधून गहू आणि तांदूळ मिळणं बंद झालं होतं. आता ई-लिलावाच्या पहिल्या फेरीत छोट्या व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद न मिळाल्याने योजनेत बदल करण्याचा विचार केला जाऊ शकतो. तांदूळ विक्रीसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या ई-लिलावाला थंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सरकार आपल्या निर्णयाचा फेरविचार करू शकतं आणि त्याचा फायदा मोफत रेशन घेणाऱ्या नागरिकांना होऊ शकतो. या संदर्भात ‘झी न्यूज हिंदी’ने वृत्त दिलंय.
कर्नाटक व केंद्र सरकारमध्ये मतभेद OMSS मध्ये राज्यांना सहभागी होण्यास नकार देताना केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले, पुढील निर्णय घेण्यापूर्वी ई-लिलाव फेऱ्या कशा होतात, हे केंद्र बघेल. OMSS अंतर्गत तांदूळ उपलब्धतेवरून काँग्रेसशासित कर्नाटक आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद आहेत. केंद्राचं म्हणणं आहे की जर सर्व राज्यांनी केंद्रीय बफर स्टॉकमधून तांदूळ मागायला सुरुवात केली तर मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा नाही. OMSS खूप वर्षांनी सुरू चोप्रा म्हणाले की, तमिळनाडू आणि ओडिशासह 15 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचं म्हणणं आहे की केंद्राच्या अन्नसाठ्याचा वापर देशातील कोट्यवधी लोकांच्या हितासाठी केला पाहिजे. ते कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी आणि विशिष्ट समाजासाठी नसावं. अन्न सचिवांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, तांदळासाठी ओएमएसएस अनेक वर्षांनंतर सुरू करण्यात आलंय. किरकोळ बाजारातील दरवाढीविरोधात बाजाराला संकेत देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. केंद्राकडे राज्यांना तांदूळ विक्री पुन्हा सुरू झाल्यास त्याचा थेट लाभ मोफत रेशन घेणाऱ्या कुटुंबांना मिळेल. LIC ची जबरदस्त स्किम, फक्त एकदा करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा पेन्शन! 5 जुलैला झाला पहिला ई-लिलाव FCI ने OMSS अंतर्गत तांदूळ विक्रीसाठी 5 जुलै रोजी झालेल्या पहिल्या ई-लिलावात 3.88 लाख टन तांदूळ विक्रीसाठी ठेवला होता, पण त्यातला केवळ 170 टन तांदूळ विकला गेला. पुढील लिलाव 12 जुलै रोजी होणार आहे. चोप्रा म्हणाले, ‘एका फेरीत चांगला प्रतिसाद न मिळाल्याने निराश होऊ नका. OMSS अंतर्गत तांदळाची विक्री संपलेली नाही. ही 31 मार्च 2024 पर्यंत सुरू राहील आणि दर आठवड्याला ई-लिलावाद्वारे विक्री केली जाईल.’ Life Insurance: तुमच्याकडेही असेल डेबिट कार्ड तर फ्रीममध्ये मिळेल 5 लाखांचं इन्शुरन्स, पण कसं? तांदळाची विक्री वाढवण्यासाठी सरकार OMSS धोरण बदलण्याचा विचार करत आहे का? असं विचारलं असता चोप्रा म्हणाले, ‘सरकारकडे पर्याय आहेत आणि गरज पडल्यास ते पुढील काही फेऱ्यांमध्ये वापरतील. सरकार बदलासाठी तयार आहे.’