बजेटमधून सर्वसामान्यांना मिळू शकतो मोठा दिलासा, या कारणामुळं टॅक्स स्लॅब कमी होण्याची शक्यता

बजेटमधून सर्वसामान्यांना मिळू शकतो मोठा दिलासा, या कारणामुळं टॅक्स स्लॅब कमी होण्याची शक्यता

सध्या देश मोठ्या आर्थिक संकटातून जातोय. त्यामुळं देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार यंदा बजेटमधून मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. सरकार खासगी टॅक्स स्लॅब कमी करण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी:  यंदा बजेडमधून सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण यंदा खासगी टॅक्स स्लॅबचे दर कमी होण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारील 2020 साली सादर होणाऱ्या बजेटमधून प्रत्यक्ष कर देणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळं आर्थिक संकटातून देशाला उभारी देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेटमधून मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या हातात पैसा राहावे यासाठी बजेटमधून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.  प्रत्यक्ष आयकर कमी झाल्यानं काही कंपन्यांना याया मोठा फायदा होणार आहे. त्याचा फायदा कोट्यवधी सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळं लोकांची खरेदी क्षमता वाढणार आहे. त्यामुळं टॅक्स स्लॅबचे दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

यंदा 20 टक्के टॅक्स कमी होणार

देशाचा जीडीपीही खाली आला आहे. तसेच सर्वस्तरात आर्थिक मंदी आहे. देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी मोठ्या धाडसी आर्थिक निर्णयाची गरज आहे. यंदाच्या बजेटमधून निर्मला सीतारामन आर्थिक सुधारणांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.  टॅक्स स्लॅबचे दर कमी होणार असल्यानं टॅक्स कलेक्शनमध्ये मोठी घट होणार असल्याचं सांगण्यात येतंय. आयकरमध्ये तब्बल 20 टक्क्यांनी घट होणार आहे. यंदा एक लाख कोटी टॅक्स कमी कलेक्शन होणार असल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे जास्त टॅक्स देणाऱ्यांची सख्या वाढणार आहे. तसेच यंदा टॅक्स देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. परिणामी टॅक्स कलेक्शन 5 टक्केचं कमी होणार असल्याचा अंदाज आहे.

यंदा वित्तीय तुट 3.4 टक्के असण्याचा अंदाज

गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या बजेटमध्ये मोठी आर्थिक तुट समोर येत आहे. यंदाच्या बजेटमधून आर्थिक तोटा वाढण्याची शक्यता आहे. यंदा बजेटमध्ये वित्तीत तुट 3.4 टक्के असण्याची शक्यता आहे. बीपीसीएलसहीत मोठ्या गुंतवणुकीतून देशात 1.3 लाख कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. टेलीकॉम सेक्टरमधूनही देशाच्या तिजोरीत मोठी वाढ होण्याची शक्यात आहे. कमी टॅक्सची भरपाई होण्यास मदत होईल.

इतर अनेक टॅक्स कमी होण्याची शक्यता

खासगी टॅक्स तर कमी होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय इतर टॅक्सही कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. डिव्हिडेंड डिस्ट्रीब्युशन टॅक्सही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेअर मार्केटमध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. सरकारनं ग्रामीण भागातील लोकांना फायदा होणार असेल असा बजेट सादर केला तर त्याचा फायदा इतर अनेक कंपन्यांना होणार आहे.

First published: January 25, 2020, 5:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading