मराठी बातम्या /बातम्या /मनी /Flipkart Sale! इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट, स्मार्टफोनही मिळणार स्वस्त

Flipkart Sale! इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट, स्मार्टफोनही मिळणार स्वस्त

फ्लिपकार्ट सेल! इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 80% सूट, तर फोनही स्वस्तात मिळणार

फ्लिपकार्ट सेल! इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 80% सूट, तर फोनही स्वस्तात मिळणार

फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मने ग्राहकांसाठी नवीन सेल जाहीर केला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, कपडे, इलेक्ट्रॉनिक आयटेम्स आणि इतर वस्तूंची खरेदी अगदी स्वस्तात करता येणार आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 14 जानेवारी: 15 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि काही दिवसांनी प्रजासत्ताक दिनही आहे. त्या निमित्ताने फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मने ग्राहकांसाठी नवीन सेल जाहीर केला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, कपडे, इलेक्ट्रॉनिक आयटेम्स आणि इतर वस्तूंची खरेदी अगदी स्वस्तात करता येणार आहे.

    केव्हा सुरू होणार सेल-

    फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने प्रजासत्ताक दिन 2023 सेलच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कंपनीचा फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल 15 जानेवारीपासून सुरू होईल आणि 20 जानेवारीपर्यंत चालेल.

    प्लस मेंबर्ससाठी खास ऑफर-

    तुम्ही फ्लिपकार्टचे प्लस मेंबर्स असल्यास तुमच्यासाठी आणखी एक फायदेशीर डील आहे. कंपनीचे फ्लिपकार्ट प्लस मेंबर्स 14 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतील. याशिवाय, तुमच्याकडे 40 Flipkart Supercoins असतील तर तुम्ही प्लस मेंबरशिपसाठी नोंदणीदेखील करू शकता. याव्यतिरिक्त, फ्लिपकार्टने सेलसाठी "ऑफर की परेड" देण्याचं वचन दिलं आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक डीलवर बचत करता येईल. त्यापैकी काही डील आणि ऑफर्सची माहिती देत ​​आहोत.

    हेही वाचा: फक्त 11,000 रुपयांमध्ये घरी आणू शकता Royal Enfield Classic 350, कपंनीनं पहिल्यांदाच आणली खास ऑफर

    फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळणार ऑफर्स

    Flipkart सेलमध्ये, तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅकचा लाभ मिळू शकतो. याशिवाय, सिटी बँक आणि आयसीआयसीआय बँकांकडून क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% इन्स्टंट सूट देखील दिली जात आहे. या सेलदरम्यान तुम्ही फ्लिपकार्टचा पे लेटर प्रोग्रामदेखील वापरू शकता. यासोबतच कंपनी 1000 रुपयांपर्यंत गिफ्ट कार्डदेखील देणार आहे. तुम्ही शॉपिंग करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टचा हा सेल अजिबात मिस करू नका. या सेलमधल्या चांगल्या डील्सचा लाभ घेऊन तुम्ही स्वस्तात शॉपिंग करू शकता.

    गॅजेट्सवर मिळेल मोठा डिस्काउंट

    फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर भरघोस सूट देणार आहे. लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर 80 %पर्यंत सूट देणार असल्याचं कंपनीने म्हटलंय. तसंच फ्लिपकार्ट टीव्ही, किचन आणि होम अप्लायन्सवर 75 %पर्यंत सूट देत आहे.

    सेल सुरू असताना मध्यरात्री 12 वाजता, सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता नवीन डील्स सादर केली जातील. फ्लिपकार्ट रश अवर डील्स प्रोग्रामदेखील चालवणार आहे. हा प्रोग्राम 15 जानेवारीपर्यंत उपलब्ध असेल.

    First published:

    Tags: Discount offer, Flipkart, Smartphone