जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Flipkart Sale : मोबाईल ते AC-TV वर 75 टक्के डिस्काउंट, पाहा धमाका ऑफर

Flipkart Sale : मोबाईल ते AC-TV वर 75 टक्के डिस्काउंट, पाहा धमाका ऑफर

Flipkart

Flipkart

नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असो किंवा टीव्ही, तुम्ही फ्लिपकार्ट सेलचा लाभ घेऊ शकता.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टनं बिग शॉपिंग डेज सेलची घोषणा केलीय. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आणि इतर उत्पादनांवर ऑफर्स व डिस्काउंट मिळेल. आज, शुक्रवारी (4 मे 2023) मध्यरात्रीपासून हा सेल सुरु होईल. नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असो किंवा टीव्ही, तुम्ही फ्लिपकार्ट सेलचा लाभ घेऊ शकता. 4 मे 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग्स डेज सेल सुरू होईल. यामध्ये बँक ऑफर्स, डिस्काउंट आणि इतर फायदे मिळतील. कंपनीनं या सेलमधील अद्याप बहुतांश ऑफर जाहीर केलेल्या नाहीत. विशेष म्हणजे, या सेलमध्ये विविध स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येतील. आयफोन 13, सॅमसंग गॅलेक्सी एस 21 एफई 5G वरसुद्धा ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर आहे. चला तर, या सेलमध्ये कोणत्या वस्तूंची खरेदी करताना तुमचा फायदा होईल, ते जाणून घेऊ. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर ऑफर्स फ्लिपकार्ट बिग शॉपिंग डेज सेलमध्ये तुम्हाला टीव्ही आणि इतर गृहोपयोगी वस्तू खरेदी करताना 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. सेलमध्ये 4K टीव्ही 16,499 रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय, वॉशिंग मशीन सुद्धा 4,990 रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रेफ्रिजरेटर्सवरही मोठ्या ऑफर आहेत. सेलमध्ये खरेदी केल्यानंतर तुम्हाला पैसे देण्यासाठी ईएमआयचा सुद्धा ऑप्शन देण्यात आलाय.

    News18लोकमत
    News18लोकमत

    या शिवाय, स्वयंपाकघरातील वस्तूंच्या किंमती 299 रुपयांपासून सेलमध्ये सुरू होतायतं. गृहोपयोगी वस्तूंवर देखील 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. जर तुम्हाला नवीन एसी घ्यायचा असेल, तर तुम्हाला सेलमध्ये त्याच्या किंमती 24,999 रुपयांपासून सुरू होत आहेत. तसेच 4 आणि 5 स्टार रेफ्रिजरेटर्स 13,990 रुपयांच्या किमतीत सेलमध्ये मिळेल. डिशवॉशर फ्लिपकार्ट सेलमध्ये 19,490 रुपयांना खरेदी करू शकता. खरेदी करताना तुम्हाला नो-कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन सुद्धा मिळेल.

    आयफोन 11 मिळतोय फक्त 15 हजार रुपयांत, फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुफान डिस्काउंट, जाणून घ्या ऑफरबद्दल

    स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट फ्लिपकार्ट सेलमध्ये विविध स्मार्टफोनच्या खरेदीवर सुद्धा मोठा डिस्काउंट मिळेल. पोको एक्स 5 प्रो 5G हा फोन 20,999 रुपयांना, रेडमी नोट 12 प्रो 5G हा फोन 21,749 रुपयांना, तर रिअलमी 10 प्रो 5G फोन 22,999 रुपयांना मिळेल. तसेच रिअलमी जीटी न्युओ 3 टी फोन 19,999 रुपयांना, तर पिक्सल 6 ए हा फोन सुद्धा कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध असेल. गुगल पिक्सल 7 सीरिजचा फोन सुद्धा कमी किंमतीत मिळेल. नथिंग फोन 1 वर देखील ऑफर असून तो तुम्हाला सेलमध्ये 27,999 रुपयांना मिळेल.

    Online Shopping Frauds: मागवला मोबाईल आले बटाटे! कंपनीकडून रिफंडही नाही, अशात कुठे करावी तक्रार?

    दरम्यान, सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आणि इतर उत्पादनांवर ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार असून ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधीच आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात