मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आयफोन 11 मिळतोय फक्त 15 हजार रुपयांत, फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुफान डिस्काउंट, जाणून घ्या ऑफरबद्दल

आयफोन 11 मिळतोय फक्त 15 हजार रुपयांत, फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुफान डिस्काउंट, जाणून घ्या ऑफरबद्दल

आयफोन 11

आयफोन 11

दिवाळीनिमित्त अनेक ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप्सवर सेल सुरू आहेत. या सेलमध्ये भन्नाट ऑफर्स देण्यात येत आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर: दिवाळीनिमित्त अनेक ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप्सवर सेल सुरू आहेत. या सेलमध्ये भन्नाट ऑफर्स देण्यात येत आहेत. फ्लिपकार्टवरही 11 ऑक्टोबर पासून Big Diwali Sale 2022 सुरू झाला आहे. हा सेल 16 ऑक्टोबर रोजी संपेल. ‘बिग बिलियन डेज’ आणि ‘बिग दसरा सेल’नंतर हा सेल सुरू झालाय. या सेलमध्ये तुमच्या खिशाला परवडणाऱ्या अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत. त्यातच तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल; पण मागच्या दोन सेलमध्ये घेऊ शकला नसाल, तर हा सेल तुमच्यासाठी फोन घेण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. या संदर्भात झी न्यूजने वृत्त दिलंय.

या सेलमध्ये तुम्हाला तुमच्या आवडत्या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळण्याची संधी आहे. कारण फ्लिपकार्ट स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेचं क्रेडिट/डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना खास डिस्काउंट देत आहे. या ग्राहकांना 5000 रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट मिळतंय. याशिवाय नॉन-ईएमआय ट्रान्झॅक्शनवर जास्तीतजास्त 1250 डिस्काउंट दिलं जातंय आणि ईएमआय ट्रान्झॅक्सनवर 1750 रुपये डिस्काउंट देण्यात येतंय.

हेही वाचा -  दिवाळीला कार घ्यायचा विचार करताय? या वाहनांवर मिळतोय तगडा डिस्काउंट

दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्ट डिस्काउंट, बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरसह फक्त 17000 रुपयांमध्ये iPhone 11 ऑफर करत आहे. Apple iPhone 11 (Red) 4GB/64GB व्हेरियंट 9910 रुपयांच्या कपातीनंतर 33,990 रुपयांना मिळतोय. एसबीआय आणि कोटक कार्डवर 10 टक्के सूट व नॉन-ईएमआय ट्रान्झॅक्शन मिळून त्याची किंमत 32,740 रुपये आणि ईएमआय ट्रान्झॅक्शन मिळून ही किंमत 32,240 रुपयांपर्यंत कमी होईल. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करत नसाल तर या किमतीत फोन तुम्हाला मिळेल.

फ्लिपकार्ट बिग दिवाली सेल 2022 युजर्सना 16,900 पर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देत आहे. पण तुम्हाला एक्सचेंज डिस्काउंट किती मिळतील हे तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून आहे. समजा, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर 16,900 रुपये एक्सचेंज प्राईज मिळाली, तर यामुळे Apple iPhone 11 ची किंमत 17,090 रुपयांपर्यंत कमी होईल. यावर, तुम्ही पुन्हा एसबीआय किंवा कोटक बँकेच्या ऑफरमधून 10 टक्के डिस्काउंटवर क्लेम करू शकता आणि अशाप्रकारे तुमच्या iPhone 11 ची किंमत 15,840 रुपयांपर्यंत कमी होईल. परंतु, समजा तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर 6,700 रुपयांची एक्सचेंज किंमत मिळाली, तर तुमच्यासाठी अ‍ॅपल आयफोन 11 ची प्रभावी किंमत बँक ऑफर आणि सर्व डिस्काउंटसह 26,040 रुपये असेल.

First published:

Tags: Discount offer, Iphone, Mobile, Sale offers