मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Online Shopping Frauds: मागवला मोबाईल आले बटाटे! कंपनीकडून रिफंडही नाही, अशात कुठे करावी तक्रार?

Online Shopping Frauds: मागवला मोबाईल आले बटाटे! कंपनीकडून रिफंडही नाही, अशात कुठे करावी तक्रार?

मागवला मोबाईल आले बटाटे!

मागवला मोबाईल आले बटाटे!

जर तुम्हीही ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणुकीला बळी पडला असाल आणि तुम्हाला परतावा मिळण्याची भीती वाटत असेल, तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 4 डिसेंबर : देशात ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या काळात लोक ई-कॉमर्स साइटवरून मोबाईल, लॅपटॉप, फॅब्रिकसह अनेक महागड्या वस्तू ऑर्डर करतात. मात्र, यासोबतच फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ग्राहकाने ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या जागी दुसरे काही उत्पादन आढळून आल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. काही प्रकरणांमध्ये डिलिव्हरी बॉक्स रिकामा आढळला तर काही यात कचरा, दगड किंवा बटाटे आढळले.

ऑनलाइन फसवणुकीशी संबंधित अशा तक्रारी देशभरातून येत असतात. वास्तविक, अशा फसवणुकीच्या घटनांसाठी विक्रेता, शिपिंग कंपनी किंवा इतर कोणीही जबाबदार असू शकतात. मात्र, यामुळे सर्वाधिक नुकसान ग्राहकांचेच होते. कारण, मालही वेळेवर मिळत नाही आणि रिफंड मिळण्यासाठी त्रासदायक प्रक्रियेला सामोरे जावे लागते.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणुकीची तक्रार कशी करावी?

तुम्हीही अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडला असाल आणि तुम्हाला पैसे परत मिळण्याची भीती वाटत असेल, तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला ई-कॉमर्स साइट किंवा विक्रेत्याशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही कंपनीच्या कस्टमर केअर विभागाशी संपर्क साधून तुमची तक्रार नोंदवू शकता. मात्र, निर्धारित वेळेत तुमची समस्या दूर झाली नाही, तर तुम्ही पुढे तक्रार करू शकता. वास्तविक, जर तुम्ही बनावट किंवा बोगस साइटवरून खरेदी केली असेल तर पैसे मिळणे जवळजवळ अशक्य होते.

ई-कॉमर्स वेबसाइटची निवारण यंत्रणा काम करत नसेल तर कंपनीच्या सोशल मीडिया पेजवर तक्रार करण्यास अजिबात संकोच करू नका.

याशिवाय, सरकारच्या तक्रार निवारण पोर्टल INGRAM (Integrated Grievance Redressal Mechanism) वर तक्रार दाखल करा.

Consumerhelpline.gov.in या ग्राहक व्यवहार साइटवरही तुम्ही तुमचा मुद्दा मांडू शकता.

त्याचबरोबर ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता. अनेक प्रकरणांमध्ये ग्राहक न्यायालयांनी ग्राहकांच्या हिताचे जलद निर्णय दिले असून निष्काळजीपणासाठी कंपन्यांना दंडही ठोठावला आहे.

नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाइन सल्ला देते की चुकीचे व्यवहार किंवा ऑनलाइन फसवणूक झाल्यास, कंपनी शोधता येत नसल्यास, ग्राहकाने एफआयआर दाखल करावा किंवा पोलीस किंवा सायबर सेलकडे तक्रार करावी.

वाचा - 5 दिवस 5 मोठे निर्णय, ज्याचा तुमच्या आयुष्यावर होणार मोठा परिणाम

केवळ निवडक ई-कॉमर्स साइटवरून खरेदी करा

ऑनलाइन फसवणूक टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बाजारात सध्या असलेल्या नामांकित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करणे, याचा फायदा असा होईल की तुम्हाला अशा समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. गेल्या काही काळापासून लोकांमध्ये ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ पाहता सायबर गुन्हेगार लोकांना आपला शिकार बनवत आहेत.

स्वस्त दरात मोबाईलचे आमिष दाखवून डिलिव्हरीच्या वेळी पाकिटांमध्ये बटाटे आणि दगड देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबईत जुलै महिन्यात पर्दाफाश झाला होता. या टोळीने देशभरात अनेकांना आपले बळी बनवले होते. उत्पादनाची ऑनलाइन ऑर्डर दिल्यानंतर, डिलिव्हरीच्या वेळी, सर्वप्रथम, डिलिव्हरी बॉयसमोर पॅकेट उघडा आणि उत्पादनाची नीट तपासणी करा. जेणेकरून फसवणूक झाली असेल तर तक्रार करायला हरकत नाही.

First published:

Tags: Online shopping, Sale