मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Success Story: 27 व्या वर्षी 10 हजार कमावणारे Paytm चे विजय शेखर शर्मा कमावतात कोट्यवधी, जाणून घ्या त्यांची यशोगाथा

Success Story: 27 व्या वर्षी 10 हजार कमावणारे Paytm चे विजय शेखर शर्मा कमावतात कोट्यवधी, जाणून घ्या त्यांची यशोगाथा

तब्बल 2.5 अब्ज डॉलर्सवर हा आयपीओ खुला झाला असून, यामुळे पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्माही (Vijay Shekhar Sharma) चर्चेत आले आहेत.

तब्बल 2.5 अब्ज डॉलर्सवर हा आयपीओ खुला झाला असून, यामुळे पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्माही (Vijay Shekhar Sharma) चर्चेत आले आहेत.

तब्बल 2.5 अब्ज डॉलर्सवर हा आयपीओ खुला झाला असून, यामुळे पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्माही (Vijay Shekhar Sharma) चर्चेत आले आहेत.

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: सध्या देशातला सर्वांत मोठा आयपीओ (IPO) म्हणून पेटीएमच्या (Paytm) आयपीओची चर्चा आहे. तब्बल 2.5 अब्ज डॉलर्सवर हा आयपीओ खुला झाला असून, यामुळे पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्माही (Vijay Shekhar Sharma) चर्चेत आले आहेत. वयाच्या 27 व्या वर्षी महिन्याला जेमतेम 10 हजार रुपये कमावणारे विजय शर्मा वयाच्या 43 व्या वर्षी अब्जाधीश (Billionaire) झाले असून, त्यांचं नाव फोर्ब्जच्या अब्जाधीशांच्या (Forbes List of Billionaires) यादीत येतं. देशातली डिजिटल पेमेंट आणि अन्य सेवा देणारी कंपनी स्थापन करण्याचा मान त्यांच्याकडे जातो. पेटीएम ही फायनान्स-टेक कंपनी आता भारतातल्या सर्वांत प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक बनली आहे. अलीगढमधल्या एका छोट्याशा गावातून बाहेर पडलेल्या विजय शेखर शर्मा यांची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे; मात्र त्यांचा इथवरचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. जाणून घेऊ या त्याविषयी...

एक काळ असा होता जेव्हा इंजिनीअर झालेले विजय शेखर शर्मा यांची कमाई महिन्याला जेमतेम 10 हजार रुपये होती. त्यामुळं त्यांचं लग्न ठरणंही अवघड झालं होतं. आपल्या या प्रवासाबाबत सांगताना ते म्हणतात, '2004 -05 मध्ये माझ्या वडिलांनी सांगितलं, की माझी कंपनी बंद करून महिन्याला 30 हजार रुपये पगाराची नोकरी मिळाली तर कर.' त्या वेळी विजय शेखर शर्मा त्यांच्या एका छोट्या कंपनीद्वारे मोबाइल सामग्री विकत असत. त्यातून फार प्राप्ती होत नसे. त्यामुळे अनेक मुली त्यांना नकार द्यायच्या. 2010 मध्ये शर्मा यांनी पेटीएमची स्थापना केली.

हेही वाचा-  Digital Loan देणारे बेकायदेशीर अ‍ॅप्स येणार कायद्याच्या कक्षेत, RBI ने आखली योजना

 विजय शेखर शर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या अलीगढ (Aligarh) जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते आणि आई गृहिणी होती. विजय शेखर यांनी त्यांचं प्रारंभिक शिक्षण अलीगढमधल्या हरदुआगंज या छोट्याशा गावातल्या हिंदी माध्यमाच्या शाळेतून केले. त्यानंतर त्यांनी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंगची पदवी घेतली. विजय शेखर यांनी 1997 मध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना indiasite.net नावाची वेबसाइट त्यांनी तयार केली होती आणि लाखो रुपयांना विकली होती. त्यानंतर त्यांनी 2000 मध्ये one97 कम्युनिकेशन लिमिटेडची स्थापना केली. त्यामध्ये क्रिकेट मॅच स्कोअर, जोक्स, रिंगटोन आणि परीक्षेचा निकाल आदी बाबी दिल्या जात असत. one97 कम्युनिकेशन लिमिटेड ही पेटीएमची मूळ कंपनी आहे; मात्र त्यातून फार कमाई होत नसल्यानं त्यांना नोकरी करण्याचा सल्ला घरच्यांनी दिला; मात्र विजय शेखर शर्मा यांना नोकरी नव्हे तर व्यवसायच करायचा होता. त्यामुळे चिवटपणे ते आपली कंपनी चालवत राहिले; मात्र त्यांनी नवनवीन उत्पादने, सेवा देण्याचा प्रयत्न सुरू केला. यातूनच 2010 मध्ये पेटीएमची स्थापना झाली.

सुरुवातीला ही एक मोबाइल रिचार्ज कंपनी होती. नंतर उबर (Uber) या ऑनलाइन ट्रान्सपोर्ट सेवा देणाऱ्या कंपनीनं पेटीएमला भारतातला आपला पेमेंट पार्टनर बनवलं, तेव्हा पेटीएमचे नशीब बदललं. त्यानंतर 2016 मध्ये जेव्हा देशात अचानक एक दिवस नोटाबंदी (Demonetisation) जाहीर झाली, तेव्हा पेटीएमचं नशीबच उजळलं. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळाल्यानं पेटीएम सर्वांपर्यंत पोहोचलं. बघता बघता 2017 मध्ये ते देशातले सर्वांत तरुण अब्जाधीश बनले. त्यांच्या आई-वडिलांना आपला मुलगा काय करतो हे माहीत नव्हतं. एकदा त्यांच्या आईने एका हिंदी वृत्तपत्रात त्याच्या संपत्तीबद्दल वाचलं, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी आपल्या मुलाला विचारलं, की तुझ्याकडे खरोखर इतके पैसे आहेत का?

हेही वाचा-  Insurance Policy : पुढच्या वर्षापासून महाग होणार इन्शुरन्स पॉलिसी? किती वाढणार प्रीमियम?

 फोर्ब्ज मासिकाने विजय शेखर शर्मा यांची संपत्ती 2.4 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 1.25 ट्रिलियन रुपये असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या आयपीओनंतर त्यात आणखी भर पडण्याचीही शक्यता आहे.

First published:

Tags: Paytm