• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • चांगल्या रिटर्नसह या 5 कारणांमुळे Fixed Deposit आहे बेस्ट! वाचा का आहे ही स्मार्ट गुंतवणूक

चांगल्या रिटर्नसह या 5 कारणांमुळे Fixed Deposit आहे बेस्ट! वाचा का आहे ही स्मार्ट गुंतवणूक

Investment in Fixed Deposit: एफडीवर इन्शुरन्स आणि इन्कम टॅक्स सवलतीचा लाभही मिळतो. काही बँका एफडी खातेधारकांना हेल्थकेअर बेनिफिट्सही देत आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली, 20 जुलै: बचत (Saving) आणि गुंतवणुकीचे (Investment) अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. तरीही फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) हा सर्वांत लोकप्रिय प्रकार आहे. यात मुद्दल सुरक्षित राहतं, हे तर लोकप्रियतेचं कारण आहेच; पण एफडीवर इन्शुरन्स आणि इन्कम टॅक्स सवलतीचा लाभही मिळतो. काही बँका एफडी खातेधारकांना हेल्थकेअर बेनिफिट्सही देत आहेत. त्यामुळे एफडीवर मिळणाऱ्या केवळ व्याजाकडे पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेणं पुरेसं नाही. एफडी अकाउंट (FD Account) सुरू करण्यापूर्वी आणखीही अनेक गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे. तज्ज्ञ असं म्हणतात, की आजच्या घडीला गुंतवणुकीच्या पर्यायांची कमतरता नाही; मात्र त्यातून नेमक्या कोणत्या पर्यायाची निवड करायची, हे ठरवणं आव्हानात्मक आहे. फिक्स्ड डिपॉझिट हे काही गुंतवणुकीचं नवं साधन नाही. एफडी हा स्मार्ट चॉइस ठरतो. एफडीचा सर्वांत मोठा फायदा हा, की एफडी एकदम कमी रकमेचीही करता येते, तसंच कमी वयाच्या व्यक्तीच्या नावावरही एफडी अकाउंट सुरू करता येतं. सुरक्षिततेसोबतच या पर्यायातून परतावाही चांगला मिळतो. हे वाचा-खूशखबर! या दिवशी तुमच्या PF खात्यात येईल 8.5 टक्के व्याज, असा तपासा तुमचा बॅलन्स फिक्स्ड डिपॉझिटच्या गुंतवणुकीतून मिळणारे फायदे निश्चित परतावा (Fixed Returns): एफडीतून निश्चित परतावा मिळतो. शेअर बाजारावर अवलंबून असलेल्या अन्य कोणत्या गुंतवणूक पर्यायांप्रमाणे याच्या व्याजदरात चढ-उतार होत नाहीत. त्यामुळे ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तसंच, कमी वयात गुंतवणुकीची सवयही या पर्यायाच्या मदतीने लागू शकते. घरबसल्या अकाउंट (At comfort of Home): पूर्वीच्या काळी फिक्स्ड डिपॉझिटसाठी बँकेची पायरी चढावी लागायची. आता मात्र इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आदी पर्यायांमुळे एफडी अकाउंट घरबसल्याही सुरू करता येतं. ती प्रक्रिया आता खूप मोठी राहिलेली नाही. अगदी काही मिनिटांत तुम्ही तुमच्याकडची रक्कम एफडीमध्ये गुंतवू शकता. इन्शुरन्स/हेल्थकेअर बेनिफिट्स (Insurance/Healthcare Benefits): एफडी हा गुंतवणुकीचा पारंपरिक आणि विश्वासार्ह पर्याय मानला जातो. आजच्या काळातही या पर्यायाकडे लोक आकृष्ट होण्यासाठी बँका मोफत लाइफ इन्शुरन्ससारख्या सुविधाही देतात. उदाहरणार्थ, डीसीबी सुरक्षा फिक्स्ड डिपॉझिटवर 50 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेइतकं मोफत लाइफ इन्शुरन्स कव्हर मिळतं. हेल्थकेअर बेनिफिट्सही एफडीवर दिली जातात. हे वाचा-नोकरदारांसाठी खूशखबर! 1ऑक्टोबरपासून बेसिक सॅलरी 15000 वरुन 21000 होण्याची शक्यता इन्कम टॅक्स सवलत (Income Tax Exemption): बँकांकडून टॅक्स सेव्हिंग एफडीची सोयही उपलब्ध केली जाते. इन्कम टॅक्स अॅक्ट 1961च्या सेक्शन 80C अंतर्गत एफडीवर करसवलत मिळते. ओव्हरड्राफ्ट (Overdraft): काही बँका एफडीच्या रकमेवर ओव्हरड्राफ्टची सुविधाही देतात. त्यामुळे एखाद्या आर्थिक आणीबाणीच्या प्रसंगी एफडी न मोडताही पैसे मिळू शकतात.
First published: