• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Mutual Fund तील गुंतवणूक काढण्यासाठी योग्य वेळ कोणती?, वाचा सविस्तर

Mutual Fund तील गुंतवणूक काढण्यासाठी योग्य वेळ कोणती?, वाचा सविस्तर

म्यूचुअल फंड - SEBI ने मल्टीकॅफ म्यूचुअल फंडसाठी असेट अलोकेशन नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, आता फंड्सचा 75 टक्के हिस्सा इक्विटीमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक असणार आहे, जो आता किमान 65 टक्के आहे.

म्यूचुअल फंड - SEBI ने मल्टीकॅफ म्यूचुअल फंडसाठी असेट अलोकेशन नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, आता फंड्सचा 75 टक्के हिस्सा इक्विटीमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक असणार आहे, जो आता किमान 65 टक्के आहे.

Mutual Funds: अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडात गुंतवणूकीचा कल वाढलेला दिसून येतो. मात्र अनेकदा गुंतवणूकदारांना यातील गुंतवणूक काढण्यासाठी काय रणनीती वापरावी हे माहित नसते.

  • Share this:
मुंबई, 19 जुलै: गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये जोखीम कमी; पण परतावा जास्त देणारा पर्याय म्हणून म्युच्युअल फंडाकडे (Mutual Fund) बघितलं जातं. थेट शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक करण्याची जोखीम टाळून तिथं मिळणाऱ्या परताव्याचा लाभ देणारा असा हा मध्यम पर्याय आहे. यामध्ये एफडी अर्थात मुदत ठेव (Fixed Deposit-FD), पोस्टातील अल्प बचत योजनांच्या तुलनेत जोखीम थोडी जास्त असते. मात्र यातून मिळणारा परतावा (Return) हा एफडीपेक्षा जास्त असतो. त्यामुळे अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडात गुंतवणूकीचा कल वाढलेला दिसून येतो. मात्र अनेकदा गुंतवणूकदारांना यातील गुंतवणूक काढण्यासाठी काय रणनीती वापरावी हे माहित नसते. चांगल्या परताव्यासाठी योग्य वेळ देणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढण्यासाठी योग्य वेळ निवडणं आवश्यक असतं. निश्चित उद्दिष्ट ठेवून गुंतवणूक करा: तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तेव्हा एखादं निश्चित उद्दिष्ट (Target) डोळ्यांसमोर ठेवून गुंतवणूक करा आणि जेव्हा ते उद्दिष्ट साध्य होईल तेव्हा ती गुंतवणूक काढून घ्या. उदाहरणार्थ, मुलीच्या लग्नासाठी आवश्यक निधी जमवण्याच्या उद्देशानं तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही एसआयपी (SIP) किंवा एक रकमी रकमेच्या माध्यमातून इक्विटी फंडामध्ये (Equity Fund) गुंतवणूक करू शकता. समजा, तुमच्या मुलीचे वय 15 वर्षे आहे आणि तुम्हाला 10 वर्षांत 25 लाख रुपये जमा करायचे असतील तर किती रक्कम जमा करावी लागेल याचा हिशेब करा. यानुसार गुंतवणूक करत असताना 10 वर्षांसाठी 12 टक्के परतावा गृहीत धरला असेल. मात्र परतावा 15 टक्के मिळाल्यानं तुमचं उद्दिष्ट सातव्या किंवा आठव्या वर्षीच साध्य झालं तर लगेच ही गुंतवणूक काढून घ्या आणि ती लिक्विड फंडात (Liquid Fund) म्हणजे सहज हवी तेव्हा काढता येईल अशा पर्यायात गुंतवा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कधी काढावी याचं हे साधं सोपं सूत्र आहे. ध्येय साध्य न झाल्यास ? : तुम्ही ठरवल्याप्रमाणे 10 वर्षांत 25 लाख रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले नाही तर काय करायचे असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. अशावेळी आपण ठरवलेली दहा वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच आठव्या, नवव्या वर्षी यातील थोडी थोडी गुंतवणूक काढून ती अन्य पर्यायात गुंतवावी. जेणेकरून वेळप्रसंगी ती सहज काढता येईल. कारण मुदत पूर्ण होईपर्यंत उद्दिष्ट साध्य होण्याच्या अपेक्षेनं तुम्ही सगळीच रक्कम गुंतवून ठेवली आणि शेअर मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण झाली तर आपला परतावा कमी होऊ शकतो. त्यामुळं हा धोका टाळण्यासाठी मुदतीआधीच थोडी, थोडी गुंतवणूक काढून ती सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. यामुळं शेवटच्या क्षणी होणारी धावपळ, त्रास टाळता येईल.

Amazon चा सर्वात मोठा सेल! लॅपटॉपवर 30 हजारांपर्यंत तर स्मार्टफोन्सवर मिळवा 10000 पर्यंतची सूट

तेजीच्या मागे धावू नका : म्युच्युअल फंडातील चढ -उतार शेअर बाजारातील चढ-उताराशी निगडीत असतात. शेअर बाजारात तेजी येते तेव्हा अनेक लोक गुंतवणूक करून मोठा नफा कमावण्याच्या मागे लागतात. बाजाराबद्दल फारशी माहिती नसणारी व्यक्तीदेखील स्टॉक मार्केटमधून एका रात्रीतून श्रीमंत होण्याची स्वप्ने बघत असते. मात्र ही सगळ्यात घातक वेळ असते. अशावेळी अतिशय सावधगिरी बाळगणं आवश्यक असतं. दहा वर्षांच्या मुदतीत दोन किंवा तीन वेळा अशी स्थिती निर्माण होते. त्यावेळी लोक सांगतात म्हणून निर्णय घेण्याऐवजी बाजारातील परिस्थिती समजून घेऊन निर्णय घेणं महत्त्वाचं असतं.

दररोज फक्त 43 रुपये गुंतवा अन् मिळवा 27.60 लाख; जाणून घ्या LIC ची नवी योजना

याबाबत सल्ला देताना अँकरगेज ट्रेनिंगचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिगर पारेख म्हणतात, ‘म्युच्युअल फंडातून गुंतवणूक काढून घेण्यासाठी पीई रेशो, पीबी आणि मार्केट कॅप-जीडीपीचे गुणोत्तर हे निकष लावणंही उपयुक्त ठरतं. हे प्रमाण आपल्या अपेक्षित सरासरीच्या तुलनेत जास्त असेल, तर त्यात तेजीचाच कल दिसत असेल तर त्या वेळी तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामधून पैसे काढू शकता किंवा ती गुंतवणूक लिक्विड फंडामध्ये टाकून नफा मिळवू शकता. एखादं उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूनं म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असताना ती कधी काढून घ्यायची याचे आडाखेही पक्के असणं, त्याबाबत एखादं निश्चित धोरण ठरवलेलं असणं गरजेचं आहे.’
Published by:Pooja Vichare
First published: