नवी दिल्ली, 19 एप्रिल : कोरोना व्हायरस लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) दरम्यान आर्थिक संरक्षणासाठी पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये 20 टक्के कपात करण्यात येणार असल्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत. असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिले आहे. वित्त मंत्रालयाने ट्वीट करून अशी माहिती दिली आहे की, केंद्र सरकार पेन्शनमध्ये 20 टक्के कपात करण्याची योजना बनवत आहे. ही बातमी खोटी आहे. पेन्शन डिस्बर्समेंट्स मध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही आहे.
(हे वाचा-3 मेनंतर सुद्धा रेल्वे सुरू होण्याची शक्यता धूसर, एअरलाइन्सचं बुकिंगही थांबवलं)
एका ट्विटर युजरने यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅग करत प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर देताना पेन्शनमध्ये कपात होणार असल्याची बातमी खोटी असल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे निर्मला सीतारामन यांनी देखील ट्वीट करत अर्थ मंत्रालयाच्या स्पष्टीकरणाला दुजोरा दिला आहे. कोरोनाच्या या संकट काळात शासनाकडून अधिकृत माहिती मिळाल्याशिवाय कोणत्याही अफवांना बळी न पडणे अपेक्षित आहे.
It is being reported that a 20% cut in Central Government Pensions is being planned.This news is FALSE. There will be no cut in pension disbursements. It is clarified that salaries and pensions will not be affected by Government Cash Management instructions.
— Ministry of Finance 🇮🇳 #StayHome #StaySafe (@FinMinIndia) April 19, 2020
Thanks for approaching seeking a clarification.
There is no cut in pension.
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) April 19, 2020
सरकारने याआधीही घोषणा केली होती की ज्येष्ठ नागरिक, विध्वा आणि दिव्यांगांना एप्रिलच्या पहिल्या 3 आठवड्यांमध्ये 3 महिन्यांचे पेन्शन आगाऊ मिळेल. राष्ट्रीय सामाजिक साहाय्यता कार्यक्रमाअंतर्गत (NSAP) समाजातील या घटकांना मदत करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता.
संपादन - जान्हवी भाटकर