मुंबई : फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवणं अधिक सुरक्षित मानलं जातं. एवढंच नाही तर आता बँकांनी देखील FD वरचे व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्राहकांना दीड वर्षांपेक्षा जास्त FD ठेवण्यासाठी जास्त व्याजदर दिलं जात आहे. काही जण तीन वर्षांसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्याच्या मागे आहेत. मात्र म्युच्युअल फंड म्हटलं की जोखीम आली. त्यामुळे किमान आपण गुंतवलेले पैसे तरी आपल्याला मिळायला हवेत अशी एक अपेक्षा तर असते. आता या दोघांमध्ये कोणता पर्याय चांगला आणि फायद्याचा ते समजून घेऊया.
Best FD Rates: या बँका Fixed Deposit वर देतात 9 टक्के व्याजदर, इथे चेक करा लिस्टम्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही दीर्घ कालवधीसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला रिटर्न जास्त मिळतात. मात्र मार्केटमधील रिस्कवरही तुम्हाला ही जोखीम घ्यायची असते. थोड्या अधिक प्रमाणात पैसे कमी जास्त होऊ शकतात. मात्र रिटर्न FD च्या तुलनेत नक्कीच चांगले मिळतात.
FD वर तुम्हाला किती रिटर्न मिळणार हे तुम्ही गुंतवणूक करतानाच तुम्हाला माहिती असतं. फक्त तुम्ही जेवढे पैसे गुंतवले आहेत ते कुठेही बुडत नाहीत. तुमचे पैसे सुरक्षित राहतात. तुम्ही ते मुदतीपूर्वी काढले तर त्यावर एक टक्का पेनल्टी लागते. तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतात.
होळीपूर्वी बजाज फायनान्सने दिलं गिफ्ट! FD च्या व्याजदरांमध्ये केली वाढतुम्ही दोन्हीमध्ये थोडे थोडे पैसे ठेवू शकता. तुम्हाला इमरजन्सीसाठी FD मधील पैसे काढता येऊ शकतात. तर म्युच्युअल फंड्समधील पैसे तीन वर्षानंतर तुम्हाला चांगल्या रिटर्न्ससह मिळू शकतात. त्यामुळे दोन्हीकडे थोड थोडे पैसे गुंतवायला सुरुवात करा. ज्यामुळे तुम्हाला दोन्हीचा फायदा घेता येईल.