जाहिरात
मराठी बातम्या / मनी / बापरे! कोट्यवधी रुपयांचं बनावट जिरं जप्त, तुमच्या घरातील जिरं योग्य आहे ना?

बापरे! कोट्यवधी रुपयांचं बनावट जिरं जप्त, तुमच्या घरातील जिरं योग्य आहे ना?

बापरे! कोट्यवधी रुपयांचं बनावट जिरं जप्त, तुमच्या घरातील जिरं योग्य आहे ना?

दिल्लीमध्ये बनावट जिरं जप्त करण्यात आलं आहे. हे जिरं तयार करणाऱ्या फॅक्ट्रीची माहिती मिळाली आणि त्यानंतर धाड टाकण्यात आली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली : कधी कुठल्या गोष्टीचा कसा फायदा कोण घेईल याचा नेम नाही. तुमच्या स्वयंपाक घरातील महत्त्वाची आणि आयुर्वेदात ज्याला महत्त्व आणि गुणकारी मानली जाणारी वस्तू म्हणजे जिरं. तुमच्या घरातील जीरं बनावट तर नाही? असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट जिरं जप्त केलं आहे. दिल्लीमध्ये बनावट जिरं जप्त करण्यात आलं आहे. हे जिरं तयार करणाऱ्या फॅक्ट्रीची माहिती मिळाली आणि त्यानंतर धाड टाकण्यात आली. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वाळलेलं गवत, चूना, गुळाचा शिरा यांच्यापासून हे बनावट जिरं तयार केलं जात होतं. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचला याची माहिती मिळताच त्यांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारण 28 हजार किलोग्राम बनावट जिरं जप्त करण्यात आलं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये हे जिरं पाठवण्याचं प्लॅन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Firecrackers Rules: या शहरात फटाके फोडल्यास 6 महिने तुरुंगवास; महाराष्ट्रात काय आहेत नियम?

दिल्लीहून गुजरातला पाठवण्यापूर्वीच हजारो किलो बनावट जिरे जप्त करण्यात आलं. जप्त केलेल्या बनावट जिऱ्याची अंदाजे किंमत 1 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दिवाळीच्या तोंडावर अन्न धान्यात मोठ्या प्रमाणावर सुरू भेसळ सुरू आहे. नागपुरात एफडीएनं 20 लाख रूपयांचं 10 हजार 800 किलो भेसळयुक्त अन्नधान्य जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. आधीच महागाईनं सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. त्यामध्ये भेसळयुक्त अन्नधान्य जप्त केल्याच्या बातमीनं आणखी चिंता वाढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात