Aadhaar-PAN linking : एक हजार लेट फीस देऊन पॅन बायोमेट्रिकच्या आधारे जोडण्याची अखेरची तारीख 30 जून होती. ज्या टॅक्सपेयर्सने या तारखेपर्यंत दोन्ही लिंक केलेलं नाही. ते इन्कम टॅक्संबंधित काही सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत.1 जुलै 2023 पासून, पॅन आधार शी लिंक न केलेल्यांचे पॅन निष्क्रिय होईल. या लोकांचा TDS आणि TCS हाय रेटवर कापला जाईल. इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 नुसार, सर्व पॅन धारक जे सूट मिळालेल्या श्रेणीत येत नाहीत त्यांनी त्यांचा पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.
अशा प्रकारे पॅन अॅक्टिव्ह केले जाऊ शकते दंड भरल्यानंतर, टॅक्सपेयर्स त्यांचा पॅन अॅक्टिव्ह करू शकतो. ही प्रक्रिया नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) पोर्टलवर चलन क्रमांक ITNS 280 अंतर्गत मेजर हेड 0021 आणि मायनर हेड 500 (इतर पावत्या) सह पैसे भरुन केली जाऊ शकते. PPF अकाउंट मॅच्योर झाल्यावर मिळतात हे 3 ऑप्शन! यात गुंतवणूक केली असेल तर अवश्य घ्या जाणून ITRs ची प्रक्रिया लिंक न करता होणार नाही PAN ला बायोमेट्रिक आधारशी जोडल्याशिवाय आयकर रिटर्न (ITR) भरणे शक्य असले तरी, आयकर विभाग आयटीआरवर प्रक्रिया करणार नाही जोपर्यंत दोन्ही लिंक होत नाहीत. शुक्रवारी, प्राप्तिकर विभागाने सांगितले की, ज्या व्यक्तींद्वारे कंसेट देऊन आणि शुक्ल भरुनही पॅन आधार जोडले गेलेले नाही त्यांच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर विचार केला जाईल. Electricity Consumers Rights: लाइट गेल्यावरही मिळू शकते भरपाई, सरकारचा नेमका नियम काय? एका ट्विटमध्ये, प्राप्तिकर विभागाने म्हटले होते की, पॅन धारकांना आधार-पॅन लिंकिंगसाठी शुल्क भरल्यानंतर चलन डाउनलोड करण्यात अडचणी आल्या आहेत. विभागाकडून सांगण्यात आले की, ‘या संदर्भात, अशी माहिती देण्यात आली आहे की, लॉग इन केल्यानंतर पोर्टलच्या ‘ई-पे टॅक्स’ टॅबमध्ये चलन भरण्याचे स्टेटस तपासले जाऊ शकते. पेमेंट यशस्वी झाल्यास, पॅन धारक आधारशी पॅन लिंक करण्यासाठी पुढे जाऊ शकतो.