'कॉमन मॅन'साठी खूशखबर! आता स्वस्त होणार कांदा, वाचा किती कमी होणार किंमत

'कॉमन मॅन'साठी खूशखबर! आता स्वस्त होणार कांदा, वाचा किती कमी होणार किंमत

सध्या कांदा सामान्य माणसाला रडवत आहे, कांद्याचे भाव गगनाला भिडले आहे. अशावेळी सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा (Onion Import from Afghanistan) निर्णय घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : सामान्या माणसाला दिलासा देण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या कांदा सामान्य माणसाला रडवत आहे, कांद्याचे भाव गगनाला भिडले आहे. अशावेळी सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा (Onion Import from Afghanistan) निर्णय घेतला आहे. यामुळे कांद्याच्या वाढत्या किंमतीतून सामान्यांना काहीसा दिलासा मिळेल. हा कांदा अफगाणिस्तानमधून खरेदी केला जाणार आहे. सरकारच्या योजनेनुसार दररोज 4000 टन कांदा भारतात येणार आहे. CNBC आवाजने याबाबत माहिती दिली आहे.

#BreakingNews | भारत 1 लाख टन प्याज इंपोर्ट करेगा

- अफगानिस्तान से भारत 1 लाख टन प्याज इंपोर्ट करेगा

- प्याज की कीमत कम करने के लिए इंपोर्ट का फैसला

- प्रतिदिन 4000 टन प्याज भारत आएगा

Posted by CNBC Awaaz on Tuesday, 27 October 2020

असे सांगण्यात येत आहे की, पुढील महिन्यापर्यंत कांद्याचे नवे पीक देखील बाजारात येईल. त्याचप्रमाणे आयात केलेला कांदा बाजारात असल्याने किंमतीच्या बाबतीत सामान्यांना दिलासा मिळेल.

सरकारकडे 25 हजार टन कांदा शिल्लक

सरकारकडे केवळ 25 हजार टन कांदा बफर स्टॉकमध्ये शिल्लक असल्यामुळे हा कांदा आयातीचा निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबरआधीच हा कांदा संपण्याची शक्यता आहे. सध्या देशातील कांद्याचे किरकोळ दर 75 रुपये किलोपेक्षा जास्त आहेत. यामुळे किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कांदा आयात करण्याची तयारी केली आहे.

NAFED विकत आहे स्वस्त कांदे

किंमती नियंत्रित करण्यासाठी नाफेड सुरक्षित भांडारातून कांदा बाजारात आणत आहे. नाफेडने यावर्षी जवळपास एक लाख टन कांद्याची खरेदी केली होती. नाफेडचे डायरेक्टर अशोक ठाकूर यांनी न्यूज18 शी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे, लवकरच 21 रुपये प्रति किलो दराने राज्यांना कांदा पाठवला जाईल. यानंतर ट्रान्सपोर्ट आणि इतर खर्चांचा हिशोब करुन राज्य त्यांच्या दराने कांदा विकू शकतात. दिल्लीतील सफल स्टोअरवर कांदा 28 रुपये प्रति किलो दराने विकला जातो आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नाफेडकडून हा 21 रुपये प्रति किलोचा कांदा मिळाल्यानंतर राज्य सरकार सर्व खर्च पकडून 30 रुपये प्रति किलोने कांदा विकू शकतात.

(हे वाचा-Loan Moratorium: चष्मा विकणाऱ्या या व्यक्तीमुळे झाला 16 कोटी लोकांचा फायदा)

कांद्याच्या वाढणाऱ्या किंमती पाहता सरकारकडून काही पावलं उचलली जात आहेत. परिणामी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या शहरातील काही भागात कांद्याचे भाव 10 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 28, 2020, 4:17 PM IST

ताज्या बातम्या