जाहिरात
मराठी बातम्या / मनी / एक रुपयांचं 'हे' नाणं तुम्हाला करोडपती बनवू शकतं; काय करावं लागेल?

एक रुपयांचं 'हे' नाणं तुम्हाला करोडपती बनवू शकतं; काय करावं लागेल?

एक रुपयांचं 'हे' नाणं तुम्हाला करोडपती बनवू शकतं; काय करावं लागेल?

छंद म्हणून अनेक जण जुन्या आणि दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करतात. काही वेळा ते दुर्मिळ नाण्यांसाठी वाटेल ती किंमत द्यायला तयार असतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 मे : जुन्या नोटा किंवा नाणी (Old Notes and Coin) जमा करण्याचा तुम्हाला छंड असेल तर घरबसल्या लाखो, करोडो रुपये कमावण्याची संधी मिळू शकतो. अनेकांना दुर्मिल वस्तू गोळा करण्याचा छंड असतो. अशा शौकिनांकडे जुन्या आणि दुर्मिळ नाण्यांचा संग्रह असतो. काही वेळा ते दुर्मिळ नाण्यांसाठी वाटेल ती किंमत द्यायला तयार असतात. अशाच 1 रुपयाच्या नाण्याबद्दल आज आपण सांगत आहोत जे तुम्हाला क्षणार्धात करोडपती बनवू शकतं. ज्या नाण्याविषयी आपण बोलतोय या विशेष नाण्याची किंमत 10 कोटी रुपये आहे. ज्या 1 रुपयांच्या नाण्याबाबत बोलत आहोत ते नाणे ब्रिटिश राजवटीचे असणे आवश्यक आहे. हे नाणे 1885 चे असावे. तुमच्याकडे 1 रुपयाचे असे नाणे असल्यास, ज्यावर 1885 साल छापलेले असेल तर तुम्ही ते ऑनलाइन लिलावासाठी ठेवू शकता. या नाण्यावर तुम्ही ऑनलाइन सेलमध्ये 9 कोटी 99 लाख रुपयांपर्यंत जिंकू शकता. रेल्वेने प्रवास करताना जास्तीचं सामान घेण्याआधी नियम समजून घ्या; अन्यथा दंड भरावा लागेल मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच एका ऑनलाइन लिलावात 1 रुपयाच्या नाण्याला 10 कोटी रुपये मिळाले आहेत. ज्या व्यक्तीने हे नाणे ऑनलाइन लिलावात विकले ती व्यक्ती काही मिनिटात श्रीमंत झाली. ही नाणी विकण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी अनेक व्यावसायिक साइट्स आहेत. तुम्हाला या साइट्सवर विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल. जुन्या नाण्यांचा लिलाव करण्यासाठी, तुम्हाला ऑनलाइन साइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी तयार करावा लागेल. यासोबतच लिलावासाठी तुम्हाला तुमच्या नाण्याचा फोटो शेअर करावा लागेल. अनेक लोक पुरातन वस्तू खरेदी करतात. काही लोक जुनी नाणी शोधत असतात आणि त्यासाठी ते भरमसाठ रक्कम देण्यास तयार असतात. देशातील Cryptocurrency गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली, 2-3 महिन्यात सर्वकाही होईल स्पष्ट विक्रेते आणि खरेदीदार यांच्या व्यवहारातील सर्वात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला नाणी खरेदी आणि विक्री करताना लक्षात ठेवावी लागेल ती डील विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात असतो. यामध्ये कोणत्याही प्रकारे आरबीआयची भूमिका नाही. आरबीआयने काही दिवसांपूर्वी अशा व्यवहारांबाबत इशाला दिला होता, की यात मध्यवर्ती बँकेची कोणतीही भूमिका नाही आणि आरबीआय याला प्रोत्साहन देत नाही. (ही माहिती अनेक मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे देण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमत या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money , rupee
  • First Published :
जाहिरात
जाहिरात