नवी दिल्ली, 20 जुलै: भारतीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीमध्ये विशेष तेजी पाहायला मिळाली आहे. आज झालेल्या वाढीमुळे सोन्याचे दर (Gold price today) गेल्या एका महिन्याच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याची वायदे किंमत 0.38 टक्के अर्थात 185 रुपयांनी वाढली आहे. या वाढीनंतर सोन्याचे दर (Gold Rates) 48,278 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीची किंमत (Gold Price Today) 0.28 टक्क्यांनी अर्थात 188 रुपयांनी वाढली आहे. आजच्या वाढीनंतर चांदीचे दर (Silver Rates) 67434 रुपये प्रति किलोच्या स्तरावर पोहोचले आहेत.
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एमसीएक्सवर (Gold Rates on MCX) सोन्याचे भाव 56200 रुपये प्रति तोळाच्या आसपास होते. हा दर आतापर्यंतचा सर्वोच्च (Gold Rates on Record High) आहे. आज सोन्याचे दर 48,278 रुपये प्रति तोळावर आहे. अर्थात आज सोन्याचे दर प्रति तोळा साधारण 7922 रुपयांनी स्वस्त आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर 0.3 टक्क्यांनी वाढून 1,818.25 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर पोहोचले आहेत. अमेरिकन बाँडमध्ये झालेल्या घसरणीमुळे सोन्याला सपोर्ट मिळाला आहे. चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे यानंतर चांदीचे दर 25.18 डॉलर प्रति औंस आहेत. प्लॅटिनमच्या दरात वाढ होऊन किंमती 1,077.98 डॉलरच्या स्तरावर आहेत.
हे वाचा-New wage code: भत्ते कमी होणार; टेक होम सॅलरी घटणार! जास्त पगारवाल्यांना फटका
24 कॅरेट सोन्याचे भाव
मंगळवारी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 51440 रुपये प्रति तोळा आहे. मुंबईमध्ये हा दर 48040 रुपये प्रति तोळा आहे. दरम्यान चेन्नई आणि कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे 49560 रुपये आणि 50300 रुपये प्रति तोळा आहे.
हे वाचा-आता ATM मधून रक्कम काढणं महागणार, एटीएम कॅश विड्रॉल चार्ज, कार्ड्स शुल्क वाढणार
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today