जाहिरात
मराठी बातम्या / मनी / EPFO updates : तुमचा UAN नंबर कशा शोधायचा, तो Activate कसा करायचा?

EPFO updates : तुमचा UAN नंबर कशा शोधायचा, तो Activate कसा करायचा?

EPFO updates : तुमचा UAN नंबर कशा शोधायचा, तो Activate कसा करायचा?

तुम्हाला तुमच्या UAN नंबर अजूनही माहिती नाही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला शोधण्याची सांगू सोपी पद्धत

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : खासगी किंवा सरकारी कर्मचाऱ्यासाठी EPFO खातं काढलं जातं. यासाठी एक विशिष्ट नंबर प्रत्येक कर्मचाऱ्याला दिला जातो. त्याला UAN नंबर असं म्हणतात. UAN नंबर म्हणजे त्या माणसाची ओळख असते. हा १२ अंकी नंबर असतो. जो EPFO कडून दिला जातो. युनिव्हर्सल अकाउंट नंबर हे असे खाते आहे ज्यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) जमा केला जातो. UAN नंबर हा खूप महत्त्वाचा आणि उपयोगी आहे. या नंबरच्या मदतीने खातेधारक आपल्या खात्यात पैसे जमा होतात की नाही ते ट्रॅक करू शकतात. पीएफ खातेधारकाला त्याचा UAN क्रमांक सुरू करावा लागेल. अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचा UAN क्रमांक माहीत नाही. तुम्हाला तुमचा UAN नंबर अजून कळू शकला नसेल, तर काही फरक पडत नाही. काही मिनिटांत तुम्ही ते अगदी सहज ऑनलाइन शोधू शकता. कसा शोधायचा तुमचा UAN नंबर यासाठी तुम्हाला www.epfindia.gov.in या EPFO च्या ऑफिशियल साईटवर भेट द्यावी लागणार आहे. होम पेजवर Services हा पर्याय निवडा. तिथे For Employees असं लिहिलेलं असेल, त्यावर क्लीक करा. Member UAN/Online Service (OCS/OTCP) हा पर्याय निवडा. नवीन पेज सुरू होईल. त्याच्या उजव्या बाजूला दिलेल्या महत्त्वाच्या लिंक्सवर जा आणि Know your UAN वर क्लिक करा. पुन्हा तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, तुमचा आधारलिंकशी जोडलेला मोबाईल नंबर तिथे टाका आणि कॅप्चर कोड लिहा आणि सबमिट करा.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी, लवकरच सुरू होणार ‘ही’ सेवा

तुमच्या मोबाईलवर OTP येईल. तो अपलोड करा. तुम्हाला तुमची जन्मतारीख अपलोड करायला सांगतील. आधार किंवा पॅन नंबर लिहा. तिथे पुन्हा कॅप्चर आयडी अपलोड करा त्यानंतर Show My UAN वर क्लीक करा. तुमचा UAN नंबर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. UNA नंबर अॅक्टिवेट कसा करायचा? यासाठी तुम्हाला www.epfindia.gov.in या EPFO च्या ऑफिशियल साईटवर भेट द्यावी लागणार आहे. होम पेजवर Services हा पर्याय निवडा. तिथे For Employees पर्यायावर क्लिक करा. तिथे खाली तुम्हाला UAN / ऑनलाइन सेवा असा पर्याय दिसेल

News18लोकमत
News18लोकमत

तिथे अॅक्टिव्हेट UAN च्या पर्यायावर क्लिक करा. तुमचा UAN क्रमांक, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि कॅप्चर कोड अपलोड करा. Get Authorization Pin वर क्लिक करा.

PM KISAN लाभार्थ्यांसाठी खुशखबर! सरकार करणार आर्थिक शेतकऱ्यांना मदत, पाहा कशी

मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो अपलोड करा त्यानंतर Agree वर क्लिक करा. यानंतर UAN अॅक्टिवेट होईल. UAN क्रमांक अॅक्टिवेट होण्यासाठी साधारण ६ तासांचा अवधी लागतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात