EPFO मध्ये क्रेडिट होत आहे व्याज, तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे आले का? अशाप्रकारे तपासा बॅलन्स

EPFO मध्ये क्रेडिट होत आहे व्याज, तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे आले का? अशाप्रकारे तपासा बॅलन्स

देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये (PF Account) सरकारने व्याज पाठवण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 साठी ईपीएफ सेव्हिंगवर सरकार 8.5 टक्के व्याज देत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 जानेवारी: देशभरातील पीएफ खातेधारकांसाठी (PF Account-Holders) खूप महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Organisation-EPFO) आर्थिक वर्ष 2019-20 साठी ईपीएफवर निश्चित 8.5 टक्के व्याज एकरकमी देत आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. या निर्णयामुळे ईपीएफओच्या जवळपास 6 कोटी सब्सक्रायबर्सवर परिणाम होणार आहे.

प्रक्रियेला सुरुवात

कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही असे म्हटले होते की, 2019-20 साठी ईपीएफवर 8.5 टक्के दराने व्याज देण्याचा प्रयत्न आम्ही करू. आम्ही 019-20 साठी ईपीएफवर 8.5 टक्के दराने व्याज देण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. आम्ही खातेधारकांच्या खात्यात व्याजदर जमा करण्याची प्रक्रिया  सुरू केली आहे.' त्यामुळे हे व्याज जमा झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स किती आहे हे तुम्ही विविध पर्यायांच्या माध्यमातून तपासू शकता.

UMANG अ‍ॅपच्या माध्यमातून तपासा तुमचा बॅलन्स

या App च्या माध्यमातून तुमच्या ईपीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवरून वन टाइम रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर तुम्ही 'उमंग'मध्ये तुमचे ईपीएफ पासबुक पाहू शकता. त्याचप्रमाणे क्लेम देखील करू शकता आणि केलेला क्लेम ट्रॅक देखील करू शकता.

(हे वाचा-सावधान ! चुकूनही करू नका हे काम, रिकामं होईल बँक अकाउंट; SBIचा इशारा)

वेबसाइटच्या माध्यमातून अशाप्रकारे तपासा तुमचा बॅलन्स

याकरता तुम्हाला Epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. याठिकाणी तुमचा UAN क्रमांक, पासवर्ज आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.

मिसकॉल देऊन तपासता येईल तुमचा PF बॅलन्स

यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता

एसएमएसच्या माध्यमातून असा तपासा पीएफ बॅलन्स

SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे.

(हे वाचा-खूशखबर! या दोन बँका 31 मार्चपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना FD वर देणार भरपूर रिटर्न)

बॅलन्स तपासण्यासाठी वापरा ईपीएफओ अ‍ॅप

ईपीएफओ अ‍ॅप ‘m-EPF’ डाऊनलोड करा. ते उघडल्यानंतर 'Member' वर क्लिक करा. त्यानंतर 'Balance/Passbook' ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. याठिकाणी तुमचा UAN क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकून तुम्ही ईपीएफमध्ये जमा असणारी रक्कम तपासू शकता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 5, 2021, 9:11 AM IST
Tags: moneyPf

ताज्या बातम्या