नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या पेन्शनधारकांना लाइफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा करण्याबाबत मोठा दिलासा दिला आहे. EPFO च्या कर्मचारी पेन्शन स्कीम 95 (EPS 95) चे निवृत्ती वेतनधारक त्यांचं लाइफ सर्टिफिकेट आता कधीही जमा करू शकतात. सर्वसाधारणपणे लाइफ सर्टिफिकेट नोव्हेंबरमध्ये जमा करावं लागतं. पण आता ते कधीही करता येणार आहे. नव्या नियमानुसार, एकदा लाइफ सर्टिफिकेट जमा केल्यानंतर त्या तारखेपासून पुढील एक वर्षापर्यंत ते वैध असेल. ईपीएफओने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. डिसेंबर 2019 मध्ये ईपीएफओने लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याच्या नियमांमध्ये बदल केला होता. निवृत्ती वेतनधारकांना त्यांचं निवृत्ती वेतन मिळत राहण्यासाठी लाइफ सर्टिफिकेट जमा करणं आवश्यक आहे. आता केवळ नोव्हेंबरपर्यंत नाही, तर वर्षभरात कधीही लाइफ सर्टिफिकेट जमा करता येईल. एकदा जमा केल्यानंतर ते पुढील वर्षी त्याच तारखेपर्यंत वैध असेल.
हे वाचा - Online PF Transfer साठी आहे सोपी प्रोसेस, पाहा कसं कराल अप्लाय
एखाद्या पेन्शनधारकाने मागील वर्षी 15 डिसेंबर 2021 रोजी आपलं लाइफ सर्टिफिकेट जमा केलं असेल, तर या वर्षी 15 डिसेंबर 2022 आधी ते पुन्हा जमा करावं लागेल. असं न केल्यास पेन्शन रोखलं जाऊ शकतं. निवृत्ती वेतनधारकांना पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी जीवित असल्याचा दाखला, लाइफ सर्टिफिकेट जमा करावं लागतं. शेवटच्या तारखेपर्यंत ते जमा केलं नाही, तर महिन्याचं पेन्शन मिळणार नाही.
हे वाचा - यंदा केंद्र सरकार लागू करणार Labour Code; कामगारांना काय होणार फायदा
लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) नंबर, आधार नंबर (Aadhaar Number), बँक अकाउंट डिटेल्स (Bank Accounts Detail) असे कागदपत्र आवश्यक आहेत. यासाठी आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल नंबर द्यावा लागेल.
EPS’95 Pensioners can now submit Life Certificate at any time which will be valid for 1 year from date of submission.
— EPFO (@socialepfo) February 19, 2022
EPS'95 पेंशनभोक्ता अब किसी भी समय जीवन प्रमाण पत्र जमा कर सकते हैं जो जमा करने की तारीख से 1 वर्ष के लिए वैध होगा।#EPFO #EPS95 #Pension #AmritMahotsav pic.twitter.com/Ca9gom5DZg
EPS 95 पेन्शनर्स आपलं लाइफ सर्टिफिकेट पेन्शन जारी करणारी बँक, कॉमन सर्विस सेंटर (CSC), पोस्ट ऑफिस, उमंग अॅप किंवा जवळच्या ईपीएफओच्या ऑफिसमध्ये जमा करू शकतात.