नवी दिल्ली, 19 जून: खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास सहा कोटींहून अधिक ईपीएफओ सब्सक्रायबर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांचे पीएफ खाते अपडेट करावं लागेल. त्यांना नॉमिनीचा (Nominee) आधार क्रमांक (Aadhar) देखील पीएफ खात्याशी (Provident Fund Account) लिंक करावं लागेल.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ (EPFO) कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते सांभाळते. ईपीएफओच्या या स्कीमला सरकारने अलीकडेच सामाजिक योजनांच्या अखत्यारित समाविष्ट केले आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक पीएफ खात्याशी लिंक करावा लागत आहे. दरम्यान याकरता अंतिम तारीख 1 सप्टेंबर देण्यात आली आहे. दरम्यान आता EPFO कडून आता नॉमिनीची (E-nomination) माहिती देखील ऑनलाइन अपडेट करून घेतली जाणार आहे. लवकरच नॉमिनीच्या आधारचा तपशील लिंक करण्यास सुरुवात केली जाईल. शिवाय त्याचा फोटो देखील ईपीएफओच्या मेंबर वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर अपलोड करावा लागेल.
ई नामांकन सुविधा (E-nomination) देखील सुरू
ईपीएफओने आता उमेदवाराची माहिती देण्यासाठी ई-नामनिर्देशन सुविधा सुरू केली आहे. यामध्ये ज्या लोकांची नावनोंदणी नाही, त्यांना संधी दिली जात आहे. नामनिर्देशित व्यक्तीचे नाव, जन्म तारीख यासारखी माहिती ऑनलाइन अपडेट केली जाईल.
हे वाचा-महत्त्वाची सूचना! सरकारने जारी केले नियम, 30 जूनपूर्वी हे काम करणं अनिवार्य...
का आवश्यक आहे नॉमिनेशन?
EPFO मधून केवळ पीएफ खात्यावर व्याज आणि पेन्शनची सुविधा नाही मिळत तर 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा देखील मिळतो. त्यामुळे नॉमिनीचं आधार व्हेरिफाय असेल तर त्याचे सर्व क्लेम सहज पूर्ण होतील. यामुळे ऑनलाइन ई-क्लेमची सुविधा देखील सुरू होईल.
पीएफ खात्याशी आधार कार्डची माहिती जुळली नाही तर मिळणारी नाहीत फायदे
केंद्र सरकारसाठी केवळ आधार डेटा वैध आहे. आधार क्रमांक जारी करणारी संस्था यूआयडीएआय (UIDAI) तुमच्या तपशीलाची पडताळणी करते. म्हणून, पीएफ खात्यामधील माहितीशी आधार डेटा जुळत नसल्यास आपल्याला पीएफचा लाभ मिळणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Epfo news, Pf, Pf news, PF Withdrawal