Home /News /money /

1 जूनपासून लागू होणार EPFO चा नवा नियम, अटी पूर्ण न केल्यास PF अकाउंट होल्डरला बसेल मोठा फटका

1 जूनपासून लागू होणार EPFO चा नवा नियम, अटी पूर्ण न केल्यास PF अकाउंट होल्डरला बसेल मोठा फटका

नियोक्ताला (Employer) पीएफ अकाउंट आधारशी लिंक (PF Account link to Aadhaar) करण्याची जबाबदारी दिली आहे. जर नियोक्ताकडून अकाउंट आधारशी लिंक केलं न गेल्यास, कर्मचाऱ्याच्या अकाउंटमध्ये कंपनीकडून दिली जाणारी रक्कम (PF Contribution) रोखली जाऊ शकते.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 30 मे : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रॉविडेंट फंड अकाउंट होल्डर्ससाठी (PF Subscribers) 1 जून 2021 पासून नवा नियम लागू (EPFO New Rule) करत आहे. या नियमानुसार असलेल्या अटी पूर्ण न केल्यास, कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीशी (Employer) याबाबत बोलून ही अट पूर्ण करावी, असं सांगण्यात आलं आहे. ईपीएफओच्या नव्या नियमांतर्गत, नियोक्ताला (Employer) पीएफ अकाउंट आधारशी लिंक (PF Account link to Aadhaar) करण्याची जबाबदारी दिली आहे. जर नियोक्ताकडून अकाउंट आधारशी लिंक केलं न गेल्यास, कर्मचाऱ्याच्या अकाउंटमध्ये कंपनीकडून दिली जाणारी रक्कम (PF Contribution) रोखली जाऊ शकते. UAN नंबर, आधारशी वेरिफाय करणं आवश्यक - EPFO च्या नव्या नियमानुसार, पीएफ सब्सक्रायबर्सचा UAN नंबर आधारशी वेरिफाईड होणं गरजेचं आहे. ईपीएफओने सामाजिक सुरक्षा संहितेच्या कलम 142 (Social Security Code) अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. नियोक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत, की 1 जून 2021 नंतर जर कोणतं अकाउंट आधारशी लिंक नसेल किंवा UAN आधारशी वेरिफाईड केलं नसेल, तर इलेक्ट्रॉनिक चालान रिटर्न (ECR) भरता येणार नाही. त्यामुळे सब्सक्रायबर्ससाठी आपलं पीएफ अकाउंट आधारशी लिंक करणं महत्त्वपूर्ण आहे.

    (वाचा - दररोज 160 रुपयांच्या बचतीवर मिळतील 23 लाख रुपये,टॅक्स सूटपासून मिळतील अनेक फायदे)

    घरबसल्या पीएफ अकाउंट करा लिंक - EPFO नुसार, पीएफ खातं आधारशी लिंक नसेल आणि UAN वेरिफाईड नसेल, तर अशा परिस्थितीत नियोक्ता, अर्थात कंपनीकडून दिलं जाणारं पीएफ योगदान थांबवलं जाऊ शकतं. ईपीएफओने नियोक्तांसाठी या संदर्भात एक अधिसूचनाही जारी केली आहे.

    (वाचा - ना फाटणार, ना भिजणार; लवकरच तुमच्या खिशात असणार 100 रुपयाची नवी नोट)

    पीएफ अकाउंट होल्डरचं अकाउंट आधारशी लिंक नसल्यास, तो ईपीएफओ सर्विसचा वापर करू शकत नाही. PF अकाउंट होल्डर ईपीएफओ वेबसाईट www.epfindia.gov.in वर लॉगइन करुन आपलं अकाउंट घरबसल्या आधारशी लिंक करू शकता.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Epfo news, Pf news

    पुढील बातम्या