जाहिरात
मराठी बातम्या / मनी / EPFO चा 6 कोटी सब्सक्रायबर्कला खास संदेश, पासबुक आणि व्याजासंबंधित दिली महत्त्वाची माहिती

EPFO चा 6 कोटी सब्सक्रायबर्कला खास संदेश, पासबुक आणि व्याजासंबंधित दिली महत्त्वाची माहिती

ईपीएफओ अपडेट

ईपीएफओ अपडेट

EPFO ने 6 कोटी सदस्यांसाठी एक खास संदेश दिला आहे. ईपीएफओने सांगितले आहे की तुम्ही पासबुकवरून व्याज अपडेट शोधू शकाल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 4 जून : तुम्ही देखील EPFO ​​चे सदस्य असाल तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने तुमच्यासाठी एक विशेष मॅसेज पाठवलाय. तुमचे व्याजाचे पैसे पीएफ खात्यात जमा झाले आहेत की नाही हे तुम्ही पासबुकच्या माध्यमातून शोधू शकाल, असे ईपीएफओने सांगितलेय. तुम्ही PFअकाउंट ऑनलाइन चेक करु शकता, ज्यासाठी तुमच्याकडे UAN नंबर आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे. EPFO ने स्पष्ट केले आहे की, व्याज उशिरा अपडेट केल्याने कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. पासबुकवरील व्याज अपडेट करणे ही एक प्रक्रिया आहे. सदस्याच्या पासबुकमध्ये ज्या तारखेला व्याजाची नोंद केली जाईल त्या तारखेला कोणतेही वास्तविक आर्थिक नुकसान होणार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

व्याज अपडेट करण्यापूर्वी पैसे काढण्यात कोणतीही हानी नाही

जर एखाद्या सदस्याने त्याच्या पासबुकमध्ये व्याज अपडेट होण्यापूर्वी त्याची EPF बॅलेन्स काढले तर, त्या प्रकरणात देखील क्लेम सेटलमेंटच्या वेळी देय व्याजाचे कॅल्कुलेशन केले जाते आणि वितरणाच्या तारखेपासून सिस्टमद्वारे ऑटोमेटिकपणे अदा केले जाते. यातही कोणत्याही सदस्याचे आर्थिक नुकसान होऊ शकत नाही.

ईपीएफ व्याज दर

आर्थिक वर्ष 2023 साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 8.15 टक्के करण्यात आलाय. याचा फायदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सहा कोटींहून अधिक भागधारकांना होणार आहे.

Investment Tips: ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचं प्लानिंग करताय? होतात हे 5 नुकसान

ऑनलाइन पासबुक कसं चेक करायंच?

तुम्ही EPFO ​​वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन EPFO ​​पासबुक चेक करू शकता. हे करण्यासाठी तुम्हाला तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि पासवर्ड लागेल.

पूर असो वा वादळ, ही पॉलिसी करेल तुमच्या कारची सुरक्षा; अवश्य घ्या जाणून

हायर पेन्शन वर अपडेट

हायर पेन्शन अंतर्गत फॉर्म सबमिट करण्याची अंतिम तारीख EPFO ​​ने 26 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, कामगार मंत्रालयाने असेही स्पष्ट केले की, हायर पेन्शनची निवड करणार्‍या सदस्यासाठी मूळ वेतनाच्या 1.16 टक्के अतिरिक्त योगदान EPFO ​​द्वारे चालवल्या जाणार्‍या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नियोक्त्यांच्या योगदानातून प्रतिबंधित केले जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात