या प्रश्नाचे सोपे उत्तर होय आहे. विमा कंपन्या नैसर्गिक आपत्तीमुळे वाहनाचे झालेले नुकसान कव्हर करतात. परंतु काही अटी आणि शर्तीही याला जोडलेल्या असतात. ज्याची पूर्तता केल्यानंतरच विमा कंपनी नुकसानीचा दावा ठरवते. याबद्दल जाणून घेण्यासाठी, पहिले तुम्हाला वेगवेगळ्या व्हीकल इन्शुरन्स पॉलिसींमध्ये उपलब्ध असलेले कव्हर समजून घ्यावे लागतील.
दोन प्रकारचं असतं वाहन विमा कव्हर : व्हीकल इन्शुरन्स पॉलिसी प्रामुख्याने दोन प्रकारची असते. यामध्ये पहिले थर्ड पार्टी कव्हर आणि दुसरे स्वतःचे डॅमेज किंवा कॉम्प्रिहेंसिव कव्हर आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसीमध्ये, तुमच्या वाहनामुळे इतरांचे होणारे नुकसान कव्हर केले जाते परंतु यामध्ये तुम्हाला स्वतःचे नुकसान कव्हर मिळणार नाही. दुसरीकडे, कॉम्प्रिहेंसिव पॉलिसीमध्ये, तुम्हाला थर्ड पार्टीसह स्वतःचे डॅमेज कव्हरही मिळते.
कॉम्प्रिहेंसिव्ह मोटार इन्शुरन्सचे फायदे: तुम्ही तुमच्या वाहनासाठी कॉम्प्रिहेंसिव्ह विमा पॉलिसी घेतली असेल, तर तुम्ही पूर, वादळ, गारपीट, भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीसाठी क्लेम करू शकता. अशा वेळी, विमा कंपनी दावा केल्यावर झालेल्या नुकसानाची भरपाई करते.
मोटार विमा घेताना, तुम्ही नैसर्गिक आपत्ती आणि पॉलिसीचे इतर प्रकारचे नुकसान भरून काढण्यासाठी अॅड-ऑन पॅकेज देखील घेऊ शकता, ज्यासाठी तुम्हाला थोडा जास्त प्रीमियम भरावा लागेल.
या गोष्टी ठेवा लक्षात : वाहन विमा घेताना कंपनी कोणत्या गोष्टी कव्हर करत आहे हे लक्षात ठेवा. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर मोटार विमा पॉलिसींशी तुलना केल्यानंतरच अंतिम निर्णय घ्या. पॉलिसीमध्ये आधीपासून उपलब्ध असलेल्या डॅमेज कव्हरचे फायदे चेक करा, जेणेकरून तुम्ही कोणतेही आवश्यक कव्हर चुकवू नये.
तुम्हाला पॉलिसीमध्ये कोणतेही एक्स्ट्रा कव्हर घ्यायचा असल्यास, त्यासाठी उपलब्ध असलेल्या अॅड-ऑन कव्हरसह तुमची पॉलिसी घ्या. कंपनीने ऑफर केलेला नो-क्लेम बोनस देखील चेक करुन घ्या.