मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPFO नॉन रिफंडेबल अ‍ॅडव्हान्ससाठी ऑनलाईन करा अर्ज आणि 3 दिवसात मिळवा पैसे, अटी काय आहेत?

EPFO नॉन रिफंडेबल अ‍ॅडव्हान्ससाठी ऑनलाईन करा अर्ज आणि 3 दिवसात मिळवा पैसे, अटी काय आहेत?

 नॉन-रिफंडेबल ईपीएफ अॅडव्हान्सची प्रक्रिया 3 दिवसात पूर्ण होते. यासाठी ऑनलाइन क्लेम फॉर्म अचूक भरलेला असणे आणि दावेदाराने पैसे काढण्याची अट पूर्ण करणे आवश्यक आहे.

नॉन-रिफंडेबल ईपीएफ अॅडव्हान्सची प्रक्रिया 3 दिवसात पूर्ण होते. यासाठी ऑनलाइन क्लेम फॉर्म अचूक भरलेला असणे आणि दावेदाराने पैसे काढण्याची अट पूर्ण करणे आवश्यक आहे.

नॉन-रिफंडेबल ईपीएफ अॅडव्हान्सची प्रक्रिया 3 दिवसात पूर्ण होते. यासाठी ऑनलाइन क्लेम फॉर्म अचूक भरलेला असणे आणि दावेदाराने पैसे काढण्याची अट पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 4 जून : एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) सदस्यांना काही अटींच्या अधीन राहून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यातून नॉन रिफंडेबल अॅडव्हान्स काढण्याची परवानगी देते. EPF नियमांनुसार, EPFO ​​सदस्य आपल्या खात्यातील एकूण ठेवींपैकी 75 टक्के किंवा तीन महिन्यांच्या बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता (DA) यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम काढू शकतो.

EPF Outstanding Balance म्हणजे कर्मचार्‍यांचा हिस्सा, नियोक्त्याचा हिस्सा आणि त्यावर मिळणारे EPF व्याज. EPFO वेबसाइटवर नॉन-रिफंडेबल अॅडव्हान्स काढण्याबाबत वारंवार प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाच्या उत्तरात, भविष्य निर्वाह निधी नियामक दावा करतो की नॉन-रिफंडेबल ईपीएफ अॅडव्हान्सची प्रक्रिया 3 दिवसात पूर्ण होते. यासाठी ऑनलाइन क्लेम फॉर्म अचूक भरलेला असणे आणि दावेदाराने पैसे काढण्याची अट पूर्ण करणे आवश्यक आहे.

पीएफ व्याजदरात कपातीमुळे कर्मचाऱ्यांचं किती नुकसान होईल? निवृत्तीनंतर तुम्हाला किती फटका बसेल?

क्लेम आणि कंडिशन

भविष्य निर्वाह निधी संघटनेने अलीकडेच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट केले आहे की नॉन-रिफंडेबल ईपीएफ अॅडव्हान्ससाठी, ईपीएफ खातेधारकाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. या अटींमध्ये गृह कर्जाची परतफेड करण्याव्यतिरिक्त घर, फ्लॅट खरेदी करणे किंवा बांधकाम करणे समाविष्ट आहे. तसेच सध्याच्या घरातील बदल, EPFO ​​सदस्याच्या कुटुंबातील सदस्याचे आजारपण, स्वतःचे किंवा मुला-मुलीचे, भावंडांचे लग्न, मुलांचे दहावीनंतरचे शिक्षण, नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश आहे.

अतिरिक्त उत्पन्नासाठी महिलेनं सुरू केला 'हा' व्यवसाय; आता दरमहा मिळतात 2 लाख रुपये

ऑनलाइन क्लेम कसा करायचा?

ईपीएफओच्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की ईपीएफ सदस्य युनिफाइड मेंबर पोर्टल (Unified Member Portal) किंवा उमंग अॅपद्वारे (Umang App) नॉन-रिफंडेबल ईपीएफ अॅडव्हान्ससाठी अर्ज करू शकतात. येथे नॉन-रिफंडेबल ईपीएफ अॅडव्हान्स काढण्याबाबत माहिती दिली जात आहे. लाइव्हमिंटच्या अहवालात नमूद केले आहे की EPF सदस्य उमंग अॅपच्या मदतीने पैसे काढण्यासाठी अर्ज करू शकतात.

>> युनिफाइड ईपीएफओ पोर्टलवर लॉग इन करा- unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface.

>> आता ऑनलाइन सर्व्हिस क्लेम (फॉर्म 31, 19, 10C आणि 10D) वर जा.

>> बँक चेकवर ज्याचे नाव लिहिले आहे ते अपलोड करा.

>> सबमिट पर्यायावर जा आणि सबमिट फॉर्म वर क्लिक करा.

First published:

Tags: Epfo news, Money, PF Withdrawal