जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पीएफ व्याजदरात कपातीमुळे कर्मचाऱ्यांचं किती नुकसान होईल? निवृत्तीनंतर तुम्हाला किती फटका बसेल?

पीएफ व्याजदरात कपातीमुळे कर्मचाऱ्यांचं किती नुकसान होईल? निवृत्तीनंतर तुम्हाला किती फटका बसेल?

पीएफ व्याजदरात कपातीमुळे कर्मचाऱ्यांचं किती नुकसान होईल? निवृत्तीनंतर तुम्हाला किती फटका बसेल?

EPFO चा नवीन व्याजदर हा 1977-78 नंतरचा सर्वांत कमी दर आहे. त्यावेळी पीएफसाठी 8 टक्के व्याजदर देण्यात आला होता. व्याजदर कपातीचा थेट परिणाम 6 कोटी पीएफ खातेधारकांवर होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 4 जून : कर्मचारी वर्गाला केंद्र सरकारकडून मोठा झटका बसला आहे. पीएफ व्याजदरात (PF Interest Rates) कपात करण्याच्या EPFOच्या निर्णयाला सरकारने मंजुरी दिली आहे. आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खातेदारांना 8.5 टक्के व्याजदराऐवजी 8.1 टक्के व्याजदर मिळणार आहे. सरकारने पीएफ खात्यावर (PF Account) मिळणाऱ्या व्याजात एकूण 0.40 टक्के कपात केली आहे. गेल्या 40 वर्षांतील हा सर्वांत कमी व्याजदर आहे. व्याजदराच्या प्रस्तावावर सरकारच्या संमतीनंतर, ईपीएफओ आता चालू आर्थिक वर्षासाठीचा निश्चित व्याजदर ईपीएफ खात्यांमध्ये जमा करण्यास सुरुवात करेल. म्हणजेच लवकरच लाभधारकांच्या खात्यात पीएफची रक्कम येणार आहे. ही रक्कम सुधारित व्याजदरांनुसार जमा होईल. नवीन व्याजदर हा 1977-78 नंतरचा सर्वांत कमी दर आहे. त्यावेळी पीएफसाठी 8 टक्के व्याजदर देण्यात आला होता. व्याजदर कपातीचा थेट परिणाम 6 कोटी पीएफ खातेधारकांवर होणार आहे. Real Estate Investment: प्रॉपर्टी खरेदी न करताही कमावा नियमित भाडे, कसं? EPFO खातेधारकांचं किती नुकसान होईल? या व्याजदरात कपात केल्यानंतर खातेदारांचे मोठे नुकसान होणार आहे. 0.40 टक्के कपात असली तरी याचं कॅलक्युलेशन केल्यानंतर नेमका कर्मचाऱ्यांना किती नुकसान होईल हे एका उदाहरणासह समजून घेऊयात. जसं की एखाद्या 30 वर्षाचा व्यक्ती ज्याचा बेसिक पगार 30,000 आहे. या व्यक्तीचा पगार दरवर्षी 5 टक्के दराने वाढत आहे. जुन्या व्याजदरावर नजर टाकली, तर त्या व्यक्तीला वयाच्या 60 वर्षांनंतर 8.5 टक्के दराने एकूण 1.40 कोटी रुपये निधी जमा होईल. मात्र या कपातीनंतर आता हा निधी 1.30 कोटी रुपये असेल. म्हणजेच, EPFO खातेदारकांचं एकूण 10 लाख रुपयांचे नुकसान होईल. Investment Tips: FD चे केवळ फायदे नाही तोटे देखील आहेत; समजून घ्या मग गुंतवणूक करा जर तुमचा वार्षिक बेसिक पगार 5 लाख रुपये असेल तर तुम्हाला 8.5 टक्के दराने 42,500 रुपये नफा मिळाला असता. पण 8.1 टक्के व्याजदराने तुम्हाला फक्त 40,500 रुपये मिळतील. अशा परिस्थितीत तुम्हाला वार्षिक 2 हजार रुपयांचे व्याज कमी मिळेल लागेल. त्याच वेळी, 10 लाखांनुसार, तुमचे एकूण वार्षिक 4 हजार रुपयांचे नुकसान होईल. त्याच वेळी, 20 लाखांच्या रकमेवर 8 हजार रुपयांचे नुकसान होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात