मराठी बातम्या /बातम्या /मनी /पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! आता तुमचं काम होणार सोपं, मिळतेय खास सुविधा

पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! आता तुमचं काम होणार सोपं, मिळतेय खास सुविधा

ईपीएफओ गुडन्यूज

ईपीएफओ गुडन्यूज

पीएफवर मिळणारा व्याजदर नुकताच वाढवण्यात आलाय. आता अजुन एक नवीन सुविधाही पीएफ खातेधारकांना देण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 29 मार्च: पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकतंच पीएफवर मिळणारा व्याजदर वाढवण्यात आला आहे. यानंतर आता पीएफ खातेधारकांना आणखी एक सुविधा सुरु करण्यात आली आहे. आता पीएफ खातेधारक घरबसल्या ई-पासबुकद्वारे त्यांच्या खात्याची माहिती मिळवू शकतात. मंगळवारी या ई-पासबुकची घोषणा करताना केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, आता पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्याचा ग्राफिक्स डेटा सहज तपासता येईल. यासाठी त्यांना ईपीएफओच्या शाखेत जावं लागणार नाही. महत्त्वाचं म्हणजे या निर्णयानंतर पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्याचे डिटेल्स घरी बसून मिळतील. दरम्यान मंगळवारी ईपीएफओनेही व्याजदर वाढवण्याचाही निर्णय घेतलाय.

लग्नासाठी सहज काढता येईल EPFO चा पैसा, फक्त लक्षात ठेवा 'या' अटी

ही आहे EPFO चं ई-पासबुक चेक करण्याची सोपी प्रोसेस

-EPF चं ई-पासबुक चेक करण्यासाठी तुम्ही epfindia.gov.in वर लॉगिन करा.

-यानंतर तुम्ही तुमचं UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाका.

- आता ई-पासबुकवर क्लिक करा.

-यानंतर तुम्हाला मागितलेली माहिती टाकावी लागेल आणि तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.

- तुमचा मेंबर आयडी ओपन करा.

-यानंतर काही मिनिटांनंतर तुम्ही तुमच्या ईपीएफ अकाउंटचं बॅलेन्स चेक करु शकता.

EPFO ने नुकताच वाढवला व्याजदर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या कोट्यवधी खातेदारांना चांगली बातमी देत ​​कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ केली आहे. सरकारने हे 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्के केले आहे. या निर्णयानंतर देशभरातील 6 कोटींहून अधिक पीएफ खातेधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

First published:
top videos

    Tags: Epfo news, PF Amount, Pf news