मुंबई, 27 फेब्रुवारी: कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत हायर पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, पात्र सदस्यांना हायर पेन्शनची निवड करण्यासाठी नियोक्त्यांसोबत संयुक्तपणे अर्ज करण्यासाठी 3 मार्च 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु आता ती 3 मे 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. हे रिटायरमेंट फंड बॉडी एंप्लॉयीड प्रोव्हिडेंट फंड ऑर्गेनायझेशन (EPFO) युनिफाइड मेंबर्स पोर्टलद्वारे केले जाऊ शकते. EPFO युनिफाइड मेंबर्स पोर्टलची URL नुकतीच अॅक्टिव्हेट करण्यात आली आहे. ज्यामध्ये 3 मे 2023 ही हायर पेन्शन निवडण्याची अंतिम मुदत स्पष्टपणे दिसत आहे. ही मुदत वाढल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत, 15,000 रुपयांपर्यंतच्या पगारानुसार कॉन्ट्रिब्यूशन निश्चित केले जाते, म्हणजेच मूळ वेतन 50,000 रुपये झाले तरीही, EPS मध्ये कॉन्ट्रिब्यूशन केवळ 15,000 रुपयांवरून निश्चित केले जाईल. यामुळे ईपीएसमध्ये खूप कमी पैसे जमा करता येतात, म्हणजेच पेन्शन तयार होते. आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे.
गेल्या वर्षी 4 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, 1 सप्टेंबर 2014 रोजी EPFO सदस्यही या उच्च पेन्शन पर्यायाचा लाभ घेऊ शकतात. यासाठी न्यायालयाने ईपीएफओला चार महिन्यांचा म्हणजेच 3 मार्च 2023 पर्यंत वेळ देण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय लक्षात घेऊन EPFO ने 20 फेब्रुवारी 2023 रोजी परिपत्रक जारी केले. यामध्ये जास्तीत जास्त 15 हजार रुपयांच्या सॅलरीच्या 8.33 टक्क्यांच्या डिडक्शनऐवजी ऐम्प्लॉयीजच्या बेसिक सॅलरीच्या आधारावर करण्यास सांगितले.
म्यूच्युअल फंडविरोधात कशी करावी तक्रार? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
EPFO च्या हायर पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी बरीच कागदपत्रे गोळा करावी लागतात. 3 मार्च 2023 ही अंतिम मुदत होती, त्यामुळे जे कर्मचारी पात्र आहेत आणि या पर्यायाची निवड करू इच्छितात त्यांना खूप धावपळ करावी लागत होती. मात्र, आता मुदत वाढवण्यात आल्याने त्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे.
नवं घर घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या कुठे मिळतंय सर्वात स्वस्त Home Loan
पात्र EPS सदस्याला जवळच्या स्थानिक EPFO कार्यालयात जाऊन अर्ज भरावा लागेल. याशिवाय आवश्यक कागदपत्रे सबमिट करावी लागतील. व्हॅलिडेशनसाठी अर्जामध्ये पूर्वीच्या सरकारी अधिसूचनांमध्ये अनिवार्य केल्याप्रमाणे डिस्क्लेमर देखील असले पाहिजे. प्रत्येक अर्जाचा डेटा डिजिटल असेल आणि अर्जदारांना एक पावती क्रमांक दिला जाईल.
हायर पेन्शनच्या अर्जांची तपासणी करून जो निर्णय घेतला जाईल, तो अर्जदारांना ई-मेल किंवा पोस्ट आणि एसएमएसद्वारे कळवला जाईल. ईपीएफओच्या आदेशानुसार, जॉइंट ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आणि ड्यू कॉन्ट्रिब्यूशनच्या पेमेंटविषयी एखादी तक्रार असेल तर EPFIGMS पोर्टलवर तक्रार करता येऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.