Home Loan Tips: होम लोन हे अनेकदा दीर्घ कालावधीसाठी असतं. हे कर्ज मोठ्या रकमेचं असतं. कर्जदार EMI मध्ये हळुहळू या कर्जाची परतफेड करतो. बर्याचदा काही अनपेक्षित परिस्थितीमुळे किंवा इतर आर्थिक संकटांमुळे, लोक ईएमआय भरु शकत नाही. एखाद्या वेळी ही चूक झाल्यास मॅनेज होऊ शकते. मात्र वारंवार असं घडल्यास वाईट परिणाम होऊ शकतो. होम लोन ईएमआय डिफॉल्ट होण्याचे कायकाय परिणाम होऊ शकतात हे जाणून घेऊया.
क्रेडिट स्कोअर : पिरामल फायनान्सचे एमडी जयराम श्रीधरन म्हणाले की, ईएमआय डिफॉल्टमुळे कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरमध्ये घसरण होते. क्रेडिट स्कोअर हा एखाद्या व्यक्तीच्या होम लोन पात्रतेचा महत्त्वपूर्ण फॅक्टर असतो. अशा डिफॉल्टमुळे दुसरे गृहकर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज मिळणे खूप कठीण होऊ शकते.
सहयोगी अर्जदारांवर परिणाम : कर्जाच्या अशा डिफॉल्टचा परिणाम सहसा सहयोगी अर्जदारांवरही होतो आणि तो फक्त मुख्य अर्जदारापुरता मर्यादित राहत नाही. ईएमआय भरण्यात डिफॉल्ट केल्याने क्रेडिट स्कोअर कमी होतो, ज्यामुळे सहयोगी अर्जदारांसाठी रोजगारापासून ते भाड्याच्या घरापर्यंत अडचणी निर्माण होऊ शकतात.
लेट पेमेंट जास्त चार्ज : लोक कर्ज घेताना सर्वात कमी व्याजदराकडे लक्ष देतात, परंतु इतर शुल्कांकडे दुर्लक्ष करतात. असाच एक महत्त्वाचा चार्ज म्हणजे लेट पेमेंट दंड, म्हणजे वेळेवर EMI जमा न केल्यास दंड भरावा लागतो. हा चार्ज वेगवेगळ्या बँकांच्या हिशोबाने वेगवेगळा असतो. यामुळे लोन घेताना लक्ष द्यायला हवं.
टॉप-अप आणि इतर कर्ज : कर्जदाराने ईएमआय पेमेंटचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड ठेवल्यास, एखादी व्यक्ती भविष्यात टॉप-अप कर्ज, वैयक्तिक कर्ज, आकस्मिक कर्ज, गृह बांधकाम कर्ज, गृह सुधारणा, विस्तार कर्ज यासारख्या विविध कर्ज पर्यायांमधून निवड करू शकते. मात्र एकही ईएमआय वेळेवर भरता आला नाही तर या ऑफर्स तुमच्यापासून दूर जाऊ शकतात.