मुंबई : खासगी असो की सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांचा EPFO असतो, त्यांना हवे तेव्हा पैसे काढता येत नाहीत. बऱ्याचदा क्लेम रिजेक्ट होतो. ईपीएफ ग्राहकांची एकच तक्रार असते की त्यांना त्यांचे ईपीएफ पैसे काढण्यात अडचणी येतात. क्लेम रिजेक्ट होतो.
कर्मचाऱ्यांच्या या तक्रारी लक्षात घेता आता ईपीएफओने क्लेमसंदर्भात नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व स्थानिक ईपीएफओ कार्यालयांना काटेकोरपणे पाळावी लागणार आहेत. याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.
स्थानिक कार्यालयांनी ईपीएफ क्लेमवर त्वरीत कार्यवाही करावी आणि सदस्यांना वेळेत त्यांचे पैसे द्यावेत, असे ईपीएफओच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं आहे. तसेच, ते वारंवार रिजेक्ट करू नये. विनाकारण क्लेम अडवू नये, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
EPFO खातं बंद झालं तर व्याज मिळणार, काय सांगतो नियम?
अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या पीएफचा क्लेम काही ना काही कारणाने रद्द केला जातो, असे अनेकदा दिसून आले आहे. कर्मचाऱ्याला पैशांची गरज असते, पण त्याला वेळेवर पैसे मिळत नाहीत आणि त्याला अडचणींचा सामना करावा लागतो.
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, क्लेम दाखल झाल्यावर त्या दाव्याच्या सुरुवातीला सखोल चौकशी व्हायला हवी, असं ईपीएफओने म्हटलं आहे. क्लेम दाखल करताना काही त्रुटी राहिल्या असतील, तर पहिल्यांदा क्लेम फेटाळताना सदस्याला सांगावं. आतापर्यंत एखादा दावा वेगवेगळ्या कारणांनी फेटाळला जातो. त्यामुळे क्लेमसाठी वेळ जातो, अशावेळी सदस्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
ईपीएफओने दिलेल्या सूचनेनुसार काही कारणांनी क्लेम रिजेक्ट केला तर तो पुन्हा पाठवला जाईल. यावर ठरविक कालावधीमध्ये कारवाई करणं आवश्यक आहे. एकदा क्लेम रिजेक्ट केल्यानंतर पुन्हा तो रिजेक्ट करता येणार नाही. क्लेममध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या एकाच वेळी सदस्याला सांगाव्या लागणार आहेत.
PF कापल्याचा मेसेज येतोय पण खात्यात जमा होतोय का? इथं करा चेक
क्लेम मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून येत आहेत. 'ईपीएफओ'च्या स्थानिक आणि विभागीय कार्यालयांना क्लेमची प्रक्रिया करण्यासाठी बराच वेळ लागतो, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक वेळा आक्षेप घेऊन दावा फेटाळला जातो. दावा दाखल करताना ज्या त्रुटी राहतात, त्या लगेच सांगितल्या जात नाहीत. या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन EPFO ने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.