जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PF कापल्याचा मेसेज येतोय पण खात्यात जमा होतोय का? इथं करा चेक

PF कापल्याचा मेसेज येतोय पण खात्यात जमा होतोय का? इथं करा चेक

PF कापल्याचा मेसेज येतोय पण खात्यात जमा होतोय का? इथं करा चेक

कंपनीकडून तुमच्या खात्यावर PF जमा होतो की नाही? कसं 2 मिनिटांत चेक करायचं पाहा

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: खासगी असो किंवा सरकारी 50 हून अधिक कर्मचारी काम करणाऱ्या कंपनीतील बहुतांश कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून EPFO ची रक्कम कापली जाते. ही रक्कम बेसिक पगाराच्या 12 टक्के एवढी असते. जस कंपनी पगारातून १२ टक्के रक्कम कापते त्याच प्रमाणे कंपनी देखील तेवढीच रक्कम EPFO मध्ये भरत असते. तुम्हाला EPFO मध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज तर आला पण खरंच जर तुमच्या खात्यावर रक्कम जमा झाली की नाही तेही तपासून पाहाणं आवश्यक आहे. तुम्ही जर तपासून पाहात नसाल तर तुम्ही चूक करताय. आजपासून तुम्ही तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होते का तपासून पाहायला हवं. एखाद्या कर्मचाऱ्याने वेळोवेळी आपला पीएफ शिल्लक तपासणे आवश्यक आहे. तुम्ही EPFO च्या वेबसाईटवर जाऊन तिथे चेक करू शकता. यासाठी तुम्हाला UAN नंबर अॅक्टिव्हेट करावा लागेल. तो झाल्यानंतर पासवर्ड सेट करा आणि UAN नंबर आणि पासवर्डच्या मदतीने तुम्ही लॉगइन करा. वर तुम्हाला पासबुकचा पर्याय दिसेल तिथे पुन्हा तुम्हाला लॉगइन करायचं आहे. पासबुकला UAN नंबर आणि पासवर्ड अपलोड केल्यानंतर लॉगइन करून तुम्हाला पाहता येईल. याशिवाय तुम्ही उमंग अॅपवरून देखील पाहू शकता. एसएमएसद्वारे ईपीएफ शिल्लक रक्कम तपासता येते. जर तुम्ही ईपीएफओकडे तुमचा यूएएन आणि मोबाइल नंबर रजिस्टर केला असेल तर एसएमएस पाठवून तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त 7738299899 एसएमएस पाठवायचा आहे. जर तुम्हाला तुमचा बॅलन्स इंग्रजी भाषेत हवा असेल, तर तुम्हाला टाइप करावं लागेल - EPFOHO UAN ENG. इथे UAN आपले वैयक्तिक यूएएन असेल, तर ENG ही आपल्या भाषेच्या पसंतीची पहिली तीन अक्षरे आहेत. इंग्रजी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये तुम्हाला तुमचा बॅलन्स चेक करण्याची मुभा देण्यात आली आहे. युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) हा कर्मचारी आणि त्याच्या कंपनी या दोघांसाठी एक ठरवून दिलेला कोड नंबर आहे. हा12-अंकी नंबर म्हणजे एकप्रकारे खातेदाराचं ओळखपत्रच असतं. हा क्रमांक कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे जारी केला जातो आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) द्वारे दिला जातो.

News18लोकमत
News18लोकमत

एकदा यूएएन तयार झाल्यावर ते बदलले जात नाही. तुम्ही कितीही नोकऱ्या बदलल्या असल्या, तरी तुमच्या नोकरीच्या काळातही ते तसंच राहतं. प्रत्येक वेळी आपण नोकरी बदलता, तेव्हा ईपीएफओ आपल्याला नोटिफिकेशनवर एक नवीन सदस्य ओळख क्रमांक (आयडी) प्रदान करते, जो आपल्या विद्यमान यूएएनशी जोडलेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: epfo news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात