मराठी बातम्या /बातम्या /मनी /EPF व्याजदरात कपात, मात्र अजूनही आकर्षक गुंतवणूक पर्याय; इतर Saving Schemes पेक्षा जास्त परतावा

EPF व्याजदरात कपात, मात्र अजूनही आकर्षक गुंतवणूक पर्याय; इतर Saving Schemes पेक्षा जास्त परतावा

मार्च 2020 मध्ये, EPFO ​​ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर 2018-19 मध्ये 8.65 टक्क्यांवरून 2019-20 साठी सात वर्षांत 8.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

मार्च 2020 मध्ये, EPFO ​​ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर 2018-19 मध्ये 8.65 टक्क्यांवरून 2019-20 साठी सात वर्षांत 8.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

मार्च 2020 मध्ये, EPFO ​​ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर 2018-19 मध्ये 8.65 टक्क्यांवरून 2019-20 साठी सात वर्षांत 8.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई, 13 मार्च : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) दोन दिवसीय बैठकीत व्यापक चर्चेनंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ईपीएफ ठेवींवरील व्याजदरात बदल (PF Interest rate) करताना तो 8.5 वरून 8.1 टक्के करण्यात आला आहे.

बैठक सुरू होण्यापूर्वी, या दोन दिवसीय बैठकीत चालू आर्थिक वर्षातील भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) व्याजासह अनेक प्रस्तावांवर मोठे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा होती. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता सीबीटी चालू आर्थिक वर्षात व्याजदर कमी करण्याचा किंवा स्थिर ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते. व्याजदरात घट असूनही, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सध्या गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

UPI पेमेंट 15 मार्चपासून आणखी सोपं, Aadhaar OTP ने अॅक्टिव्हेट करता येणार यूपीआय

पीएफ गुंतवणूक सुरु ठेवा

गुंतवणूक सल्लागार बळवंत जैन म्हणतात की, सरकार तुमचे पीएफचे पैसे जिथे गुंतवते, तिथे परतावा कमी झाला आहे. त्यामुळे सरकारने यावरील व्याजदरात कपात केली आहे. परंतु, पीएफचा व्याजदर अजूनही महागाई दरापेक्षा जास्त आहे आणि इतर बचत योजनांच्या तुलनेत आकर्षक आहे. ते म्हणाले की, गुंतवणूकदारांनी पीएफवरील व्याजदर कमी झाल्याचा विचार करून त्यापासून दूर राहू नये.

विना हॉलमार्क Gold दागिन्यांची अशी करा शुद्धता तपासणी, पाहा किती द्यावं लागेल शुल्क

CBT ने निश्चित केलेल्या व्याजदरावर अंतिम निर्णय घेणे बाकी आहे. CBT च्या अलीकडील निर्णयानंतर, 2021-22 साठी EPF ठेवींवरील व्याजदराची माहिती मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवली जाईल. तेथून मंजुरी मिळाल्यानंतरच हा दर लागू होईल. मार्च 2020 मध्ये, EPFO ​​ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर 2018-19 मध्ये 8.65 टक्क्यांवरून 2019-20 साठी सात वर्षांत 8.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

इतर योजनांच्या तुलनेत पीएफ आकर्षक

>> EPF- 8.1 टक्के 5 वर्षे

>> सुकन्या समृद्धी योजना- 7.6 टक्के 15 वर्षे

>> ज्येष्ठ नागरिक बचत योजना - 7.4 टक्के 5 वर्षे

>> PPF 7.1 - टक्के 15 वर्षे

>> किसान विकास पत्र - 6.9 टक्के 124 महिने

>> NSC - 6.8 टक्के 5 वर्षे

>> पोस्ट ऑफिस मासिक योजना - 6.6 टक्के 5 वर्षे

>> मुदत ठेव - 3.5-6.8 टक्के 7 दिवस ते 10 वर्षे

>> राष्ट्रीय पेन्शन योजना - 60 वर्षे वयापर्यंत 5-8 टक्के

First published:

Tags: Epfo news, Investment, Pf