मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Pension Account : पेन्शन खातं बँकेच्या जवळच्या शाखेत ट्रान्स्फर कसं करायचं? वाचा स्टेप्स

Pension Account : पेन्शन खातं बँकेच्या जवळच्या शाखेत ट्रान्स्फर कसं करायचं? वाचा स्टेप्स

कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार

कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार

काही व्यवहार करण्यासाठी आपल्याला बँकेच्या मुख्य शाखेत जावे लागते. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांना अडचण निर्माण होते. अशा परिस्थितीत पेन्शन खातं (Pension Account) घराजवळच्या शाखेत ट्रान्स्फर करणं खूप महत्त्वाचं असतं. ते कसं करायचं, हे जाणून घेऊ या.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: उच्चशिक्षित, तसंच अन्यही अनेक जण दुसऱ्या शहरामध्ये वास्तव्याला असतात. तिथेच त्यांचं बस्तान बसतं. ज्या शहरात नोकरी केली जाते, सहसा तिथेच बँक खातं (Bank Account) उघडलेलं असतं. निवृत्तीनंतर अनेक जण दुसऱ्या शहरात किंवा आपल्या मूळ गावी परततात. अशा वेळी कागदपत्रंही बदलावी लागतात. यात सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बँक खाते, ज्यात पेन्शन जमा होते. शहर सोडल्यानंतर बँक खातं घराच्या जवळच्या शाखेत ट्रान्स्फर (Account Transfer) करणं गरजेचं असतं, जेणेकरून सर्व कामं सहजपणे करता येतात.

अनेकदा दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर बँक खात्याचे व्यवहार करताना अनेक समस्या निर्माण होतात. काही व्यवहार करण्यासाठी आपल्याला बँकेच्या मुख्य शाखेत जावे लागते. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांना अडचण निर्माण होते. अशा परिस्थितीत पेन्शन खातं (Pension Account) घराजवळच्या शाखेत ट्रान्स्फर करणं खूप महत्त्वाचं असतं. ते कसं करायचं, हे जाणून घेऊ या.

सध्याच्या डिजिटल युगात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कामं ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने करता येतात. नुकतंच एका व्यक्तीने आपल्या वडिलांचं पेन्शन खातं ट्रान्स्फर करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात ट्विट करून स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank Of India) विचारणा केली होती. वडिलांचं पेन्शन खातं घराजवळच्या शाखेत ट्रान्स्फर करण्याची माहिती त्या व्यक्तीने बँकेला टॅग करून ट्विटद्वारे विचारली होती. यावर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) अधिकृत खात्याने उत्तरादाखल टि्वट केले आणि खातं ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया सांगितली. SBI ने ट्विटमध्ये म्हटलं आहे, की, बँकेचे ग्राहक नवीन किंवा जुन्या शाखेत, तसंच नेट बँकिंगद्वारे अर्ज करून आपलं खातं जवळच्या शाखेत ट्रान्स्फर करू शकतो. याबाबतचं वृत्त `टीव्ही 9 हिंदी`ने दिलं आहे.

हे वाचा - या चुकांमुळं हिवाळ्यात वाढतो Heart Attack चा धोका, या गोष्टी टाळणंच ठरेल फायदेशीर

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) 22000 प्लस पेन्शन देणाऱ्या कोणत्याही शाखेत पेन्शन खातं ट्रान्स्फर करण्याची सुविधा दिली आहे. ज्येष्ठांना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून ग्राहक हेल्पलाइन नंबर दिला आहे. 1800110009 (टोल फ्री) या क्रमांकावर कॉल करून ग्राहक खातं ट्रान्स्फर करण्याची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. तसंच स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी ई-मेलही उपलब्ध करून दिला आहे. ग्राहक gm.customer@sbi.co.in आणि dgm.customer@sbi.co.in यावर ईमेल करून शाखा ट्रान्सफर (Branch Transfer) करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ शकतो. याशिवाय, गरज भासल्यास SBI च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर डायरेक्ट मेसेज करूनही माहिती मागवता येते. तसंच संबंधित ई-मेलवर तुम्ही तक्रारही करू शकता.

हे वाचा - Weight loss tips : डाएटिंग न करताही कमी होईल वजन, फक्त पोट भरून खा ही भाकरी

भारतीय स्टेट बँकेनं ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सोय केली आहे. निवृत्तिवेतन हा जिव्हाळ्याचा विषय असतो. म्हातारपणात प्रत्येकासाठी निवृत्तिवेतनाचा मोठा आधार असतो. त्यामुळे सेवेतून निवृत्ती झाल्यानंतर निवृत्तिवेतनधारकांनी प्रथम आपले पेन्शन खातं ट्रान्स्फर करून घ्यावं, जेणेकरून बँकेचे व्यवहार करताना कसरत करावी लागणार नाही.

First published:

Tags: Pension, Pension scheme