मुंबई, 24 जुलै : संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या सॅलरीचा एक भाग कर्मचारी भविष्य निधी संघटनेत जमा होतो. हे पैसे कर्मचारी इमरजन्सी किंवा रिटायरमेंटच्या वेळी काढू शकतात. या फंडमध्ये केवळ कर्मचारीच नाही तर एंप्लॉयरही एक भाग जमा करतात. तुम्हीही पीएफ अकाउंट होल्डर असाल आणि तुम्हाला घरबसल्या तुमचं पासबुक चेक करायचं असेल तर याच्या सोप्या पद्धती आपल्याकडे आहे. ईपीएफओने कोट्यवधी अकाउंट होल्डरर्सला मोबाइल आणि डिजिटल पद्धतींनी बॅलेन्स चेक करण्याची सुविधा दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया घरबसल्या ईपीएफ पासबुक कसं चेक करता येईल.
अशा प्रकारे चेक करता येईल ईपीएफ बॅलेन्स 1. फक्त मिस्ड कॉलद्वारे ईपीएफ बॅलेन्स करा चेक - EPFO आपल्या कोट्यवधी खातेदारांना फक्त मिस्ड कॉलद्वारे ईपीएफ बॅलेन्स चेक करण्याची सुविधा प्रदान करते. यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरून 011- 22901406 या नंबर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर, काही मिनिटांत तुम्हाला एक मॅसेज येईल. ते उघडल्यावर तुम्हाला तुमचं बॅलेन्स दिसेल. 2. SMS द्वारे करु शकता चेक मिस्ड कॉल व्यतिरिक्त, तुम्ही केवळ एसएमएसद्वारे EPFO डॉक्यूमेंट्स देखील चेक करु शकता. लक्षात ठेवण्यासाठी, तुमची सर्व कागदपत्रे UAN शी लिंक केलेली असावीत. बॅलेन्स जाणून घेण्यासाठी, EPFOHO UAN भाषा लिहा आणि 7738299899 वर पाठवा. यानंतर, काही मिनिटांत तुम्हाला ईपीएफकडून बॅलेन्सचा मॅसेज येईल. PM Kisan Scheme: लाभार्थींच्या लिस्टमध्ये नाव असुनही मिळणार नाही 14 हप्ता, पण का? 3. EPF पोर्टलद्वारे चेक करा पासबुक बॅलेन्स चेक करण्यासाठी https://www.epfindia.gov.in/site_en/index.php ला भेट द्या. यानंतर येथील Our Services च्या ऑप्शनवर जा आणि For Employees सिलेक्ट करा. पुढे, सेवा ऑप्शनवर जा आणि member passbook ला व्हिजिट करा. पुढील पेजवर तुम्हाला UAN नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. यानंतर कॅप्चा पुढे टाकावा लागेल. यानंतर तुमचा मेंबर आयडी टाका. काही मिनिटांत तुम्हाला EPF बॅलेन्स मिळेल. Insurance Policy: विमा पॉलिसी घेताय? मग आधी जाणून घ्या या 4 कॉमन मिस्टेक, एक चूक आणि मिळणार नाही क्लेम 4. UMANG App वरून चेक करा बॅलेन्स सर्व प्रथम Umang App मोबाईलमध्ये डाउनलोड करा. यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल टाका. यानंतर EPFO ऑप्शनवर क्लिक करा. पुढे Employee Centric Services वर क्लिक करा. यानंतर view Passbook वर क्लिक करा. यानंतर UAN नंबर आणि रजिस्टर्ड मोबाईलवर OTP टाकावा लागेल. पुढे, तुमच्या समोर EPF पासबुक उघडेल.