नवी दिल्ली, 17 जुलै : कोरोनाच्या कालावधीनंतर जीवन विमा आणि आरोग्य विम्याला लोक अधिक महत्व देऊ लागले आहेत. आता अधिकाधिक लोकांनी विमा पॉलिसी घेण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही विमा पॉलिसी घेत असाल, तर तुम्हाला पॉलिसीच्या अटी आणि क्लेम संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. इन्शुरन्स क्लेम नाकारण्यात अशा काही गोष्टींचा महत्त्वाचा वाटा असतो, ज्याकडे सहसा विमा काढताना फारसे लक्ष दिले जात नाही.
लाइफ इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होणे खूप दुःखद आहे. जीवन विमा घेणारी व्यक्ती घरातील एकमेव कमावती व्यक्ती असेल आणि तिचा मृत्यू झाला तर जीवन विम्यामधून मिळणारी रक्कम कुटुंबाच्या जगण्यासाठी खूप मदत करते. दुसरीकडे हक्काचे पैसे न मिळाल्यास कुटुंबासमोर मोठी समस्या निर्माण होते. म्हणूनच जीवन विमा पॉलिसी घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टींमुळे इन्शुरन्स क्लेम नाकारला जाऊ शकतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. खोटी माहिती देणे लाइफ इन्शुरन्स घेताना, विमाधारकाने कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास, इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होण्याची शक्यता वाढते. आरोग्य, वय, वजन, उंची किंवा उत्पन्न याबाबत चुकीची माहिती देणे, पॉलिसी घेताना विमाधारकाने चुकीची माहिती दिल्यास इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. Pin Secure : डेबिट-क्रेडिट कार्ड पिन सिक्योर ठेवण्याचे 6 फॉर्म्यूले, मिळेल सुपर सिक्योरिटी! प्रीमियम का भुगतान न करना जीवन बीमा तभी एक्टिव रहता है जब बीमाधारक समय पर किस्तों का भुगतान करे. बीमा कंपनियां किसी किस्त के ड्यू होने पर उसे भरने के लिए 30 दिन का अतिरिक्त समय भी देती हैं. अगर बीमाधारक ग्रेस पीरियड में भी प्रीमियम को भुगतान नहीं करता है तो पॉलिसी लैप्स हो जाती है. प्रीमियम न भरण जेव्हा विमाधारक वेळेवर हप्ते भरतो तेव्हाच जीवन विमा सक्रिय राहतो. कोणताही हप्ता भरण्यासाठी विमा कंपन्या 30 दिवसांचा अतिरिक्त वेळ देतात. विमाधारकाने वाढीव कालावधीतही प्रीमियम भरला नाही, तर पॉलिसी लॅप्स होते. Success Story: ना IIT ना IIM ची डिग्री, तरीही कोट्यवधींची सॅलरी; रोज 36 लाख कमावते ही व्यक्ती! कॉन्टॅक्ट पीरियड विमा पॉलिसी घेण्याच्या 2 वर्षांपर्यंतच्या कालावधीला कॉन्टेस्ट पीरियड म्हणतात. या काळात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी विमा क्लेम नाकारते. पण, असं नाही की सर्व क्लेम रिजेक्ट केले जातात. कॉन्टेक्ट पीरियड दरम्यान मृत्यू झाल्यावर विमा कंपनी विमाधारकद्वारे दिलेली माहिती योग्य प्रकारे तपासून चौकशी करते. म्हणूनच सुरुवातीला योग्य माहिती द्यावी म्हणजे नंतर कोणतीही अडचण येणार नाही. नॉमिनी नसणे साधारणपणे, पॉलिसीधारक त्यांच्या पालकांना नॉमिनी करतात. काहीवेळा असे होते की नॉमिनीचा मृत्यू होतो आणि त्यानंतर विमा दावा केला जातो. अशा परिस्थितीत, नॉमिनी व्यक्तीच्या अनुपस्थितीमुळे विमा क्लेम नाकारला जातो. म्हणूनच पॉलिसीधारकाने त्याच्या नॉमिनीचे डिटेल्स नेहमी अपडेट ठेवले पाहिजेत.