मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPF आणि Bank Account ची माहिती न जुळल्यास पैसे काढण्यात येतेय अडचण? मग या स्टेप्स करा फॉलो

EPF आणि Bank Account ची माहिती न जुळल्यास पैसे काढण्यात येतेय अडचण? मग या स्टेप्स करा फॉलो

जर एखाद्याला त्याच्या माहितीमध्ये ऑफलाइन दुरुस्ती करायची असेल तर त्याला संबंधित फॉर्म भरावा लागेल आणि एम्प्लॉयरने देखील फॉर्म भरल्यानंतर तो ईपीएफओ कार्यालयात पाठवावा लागेल.

जर एखाद्याला त्याच्या माहितीमध्ये ऑफलाइन दुरुस्ती करायची असेल तर त्याला संबंधित फॉर्म भरावा लागेल आणि एम्प्लॉयरने देखील फॉर्म भरल्यानंतर तो ईपीएफओ कार्यालयात पाठवावा लागेल.

जर एखाद्याला त्याच्या माहितीमध्ये ऑफलाइन दुरुस्ती करायची असेल तर त्याला संबंधित फॉर्म भरावा लागेल आणि एम्प्लॉयरने देखील फॉर्म भरल्यानंतर तो ईपीएफओ कार्यालयात पाठवावा लागेल.

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : पीएफ अकाउंट (PF Account) आणि बँक अकाउंट (Bank Account) यामध्ये दिलेली माहिती अनेकदा जुळत नाही. अशा परिस्थितीमध्ये पीएफ खात्यातून पैसे काढता येत नाहीत. अनेक जणांची जन्मतारीख चुकीची नोंदलेली असते, तर काही खातेदारांनी वडिलांची नावे लिहिलेले नसते. अशा परिस्थितीत ईपीएफ युजर्सना (EPF User) अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. परंतु या सर्व चुका आपल्याला सुधारण्याची संधी आहे.

ऑनलाइन सुविधा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) आपल्या युजर्ससाठी नवीन सेवा आणत आहे. याद्वारे घरी बसून युजर्स आपली माहिती अपडेट (information update) करू शकतील. यापूर्वी माहिती अपडेट करण्यासाठी कर्मचारी व एम्प्लॉयर या दोघांनाही जॉइंट रिक्वेस्ट द्यावी लागत होती. आता ईपीएफओने ऑनलाइन रिक्वेस्ट (online request) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कर्मचाऱ्याकडून रिक्वेस्ट प्राप्त झाल्यानंतर, सिस्टम त्याची तुलना आधार डेटाशी करेल. व्हेरिफिकेशननंतर, ही रिक्वेस्ट एम्प्लॉयर लॉगिनवर पाठविली जाईल. यानंतर बदलाची प्रक्रिया केली जाईल.

ऑनलाइन सुधारणा प्रक्रिया

ईपीएफओच्या यूनिफाइड मेंबर पोर्टलला भेट द्या. त्यानंतर आपला यूएएन आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

होम पेजवरील मॅनेज मॉडिफाईड बेसिक डिटेल्स या पर्यायावर जा. जर तुमचे आधार व्हेरिफाइड असेल तर डिटेल्स एडिट होणार नाहीत.

आपल्या आधारकार्डवर असलेला योग्य तपशील भरा, त्यानंतर सिस्टम आधार डेटासह तो व्हेरिफाय करेल.

तपशील भरल्यानंतर अपडेट तपशीलांवर क्लिक करा, माहिती एंप्लॉयरकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल.

7th Pay Commission: दीड वर्षापासून DA एरिअर फ्रीझ, मोदी सरकार लवकर निर्णय घेणार?

एम्प्लॉयर पूर्ण करतील ही प्रक्रिया

एम्प्लॉयर पोर्टलवर लॉगिन करून मेंबर डिटेल्स चेंज रिक्वेस्टवर क्लिक करून तुम्ही बदल पाहू शकता.

एम्प्लॉयर माहिती तपासून त्याला मंजुरी देईल. मंजुरीनंतर, एम्प्लॉयर स्टेटस अपडेट तपासू शकतात.

यानंतर एम्प्लॉयर रिक्वेस्ट ईपीएफओ कार्यालयाला पाठवेल. जिथे फिल्ड ऑफिसर क्रॉस चेक करतील. यानंतर, तपशील बरोबर असल्यास प्रादेशिक भविष्य निधी आयुक्त कार्यालयाकडून तपशील मंजूर केला जाईल.

अशी करा ऑफलाइन दुरुस्ती

जर एखाद्याला त्याच्या माहितीमध्ये ऑफलाइन दुरुस्ती करायची असेल तर त्याला संबंधित फॉर्म भरावा लागेल आणि एम्प्लॉयरने देखील फॉर्म भरल्यानंतर तो ईपीएफओ कार्यालयात पाठवावा लागेल. तेथे त्यांची माहिती तपासल्यानंतर, ती खात्यात अपडेट केली जाईल. 7738299899 या क्रमांकावर SMS करूनही याची माहिती मिळवता येते. सदस्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम किती आहे याबाबत ही माहिती मिळू शकते.

Aadhaar मध्ये अ‍ॅड्रेस अपडेट करण्यासाठी नियमांत बदल, UIDAI ने सांगितला नवा नियम

...तर पैसे काढता येणार नाहीत

जर ईपीएफओमध्ये चुकीचे बँक तपशील भरले असतील तर पीएफचे पैसे काढता येणार नाहीत. कारण ईपीएफओमध्ये ज्या खात्याची माहिती भरली असते, पैसे त्याच खात्यात येतात. जर बँक तपशील चुकीचा असेल तर क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. ईपीएफओमध्ये नोंद केलेले बँक खाते बरोबर असावे आणि ते खाते युएएन (UAN) शी जोडलेले असावे.

First published:

Tags: Epfo news