Home /News /money /

एका वर्षात 'तिनं' केली आठ लाख रुपयांची बचत, जाणून घ्या Saving Tips

एका वर्षात 'तिनं' केली आठ लाख रुपयांची बचत, जाणून घ्या Saving Tips

कॅश बक्षिसं देणाऱ्या अनेक स्पर्धांमध्येही तिनं सहभाग घेतला होता. एका रेस्टॉरंटनं तर तिला 12 हजार रुपयांपर्यंत मोफत जेवणाची ऑफरही दिली होती.

    नवी दिल्ली, 11 डिसेंबर : सध्या जगातील प्रत्येक व्यक्ती कुठल्यानं कुठल्यामार्गानं आपली संपत्ती वाढवण्यात व्यस्त आहे. बचत करण्याची सवय ही पैसा वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते. कारण तुम्हाला कितीही जास्त पगार असेल मात्र, तुम्ही बचतच (Savings) केली नाही तर कधीही रस्त्यावर येऊ शकता. काही लोक तर इंटरनेटवर पैसे वाचवण्याच्या युक्त्या (Tricks to Save Money) शोधत असतात. इंटरनेटवर अनेक तज्ज्ञ पैशांची बचत करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची माहिती देतात. परंतु काहीवेळा त्या योजना कठिण वाटतात. सामान्य माणसाला त्यांचं पालन करणंही अवघड वाटतं. मात्र, काही दिवसांपूर्वी एका महिलेने लोकांना बचतीच्या अशा युक्त्या सांगितल्या आहेत. (Woman Shares Simple Tricks for Saving) ज्या जाणून घेतल्यानंतर तुम्हीही त्या महिलेप्रमाणे एका वर्षात लाखो रुपये वाचवू शकता. इंग्लंडमधील ब्रॅकनेल (Bracknell, England) येथे राहणारी 35 वर्षीय नादिन बॅरेट (Nadine Barrett) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नादीन लाइफ कोच आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. काही दिवसांपूर्वी आपण अतिशय सोप्या मार्गांचा अवलंब करून फक्त एका वर्षात आठ लाखांहून अधिक रुपयांची बचत केल्याचं (Woman Save 8 lakh rupees in 1 year) उघड केलं. नादिनच्या युक्त्या जाणून लोक खूप प्रभावित झाले आहेत. अनेकजण तर या युक्त्यांचा वापर करण्याचा विचारही करत आहेत. वाचा : 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा ई-नॉमिनेशनची प्रक्रिया, अन्यथा... नादिनला आहे पैसे बचतीचा छंद द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, नादिनला पैशांची बचत (Money Saving) करण्याचा एक प्रकारचा छंदच आहे. ती कायम पैसे वाचवण्याचा विचार करत असते. तिनं एका वर्षापूर्वीच ख्रिसमससाठी भेटवस्तूंची खरेदी केली होती. इतकंच नाही तर ती अनेक ऑनलाइन सर्व्हेंमध्येही (Online survey) सक्रिय सहभाग घेते ज्यातून तिला पैसे मिळतात. कॅश बक्षिसं देणाऱ्या अनेक स्पर्धांमध्येही तिनं सहभाग घेतला होता. एका रेस्टॉरंटनं तर तिला 12 हजार रुपयांपर्यंत मोफत जेवणाची ऑफरही दिली होती. मला पैशांची बचत करणं आवडतं. त्यामुळं कुठल्याही प्रकारे पैशांची बचत करते. सतत बचत करत असल्यामुळं मला कधी पैशांची चिंता करावी लागत नाही, अशी माहिती लेटेस्ट डील्स डॉक यूके या वेबसाइटशी बोलताना नादिननं दिली. वाचा : PNB ग्राहकांसाठी ALERT! सावध नाही राहिल्यास तुमच्या कष्टाच्या पैशांवर फिरेल पाणी, अकाउंट रिकामं होण्याची भीती नादिननं शेअर केल्या अनोख्या सेव्हिंग्ज ट्रिक्स नादिन बॅरेटनं लोकांना पैसे बचतीच्या काही खास टिप्सही (Savings Tips) दिल्या आहेत, ज्यांचा वापर करून पैसे वाचवले जाऊ शकतात. नादिन सांगते की, ख्रिसमसच्या (Christmas) काळात खूप जास्त खर्च होतो. थोडंसं नियोजन केलं तर ख्रिसमसच्या काळातही पैशांची बचत करता येते. वर्षाच्या सुरुवातीपासूनच ख्रिसमससाठी कपडे, भेटवस्तू (Gifts) इत्यादींची खरेदी करायला सुरुवात करावी. याशिवाय वर्षभर विविध साइट्सवरील डिस्काउंट (Discount) आणि ऑफर्सवर (Offers) लक्ष ठेवावं. जेव्हा ऑनलाइन शॉपिंग (Online shopping) साइट्सवर सेल सुरू होतात तेव्हाच नादिन अनेक वस्तू खरेदी करून ठेवते. सोबतच ती वेगवेगळ्या भेटवस्तूदेखील खरेदी करते जेणेकरुन दुसर्‍याला भेटवस्तू द्यावी लागली तर त्या महागड्या दराने खरेदी करण्याची गरज पडत नाही. एवढेच नाही तर नादिननं सांगितलं की, लोकांनी आपल्या फावल्या वेळात विविध ऑनलाइन सर्व्हे आणि स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे. असे अनेक सर्व्हे व स्पर्धा असतात ज्यामध्ये बक्षीस म्हणून भेटवस्तू किंवा पैसे मिळतात. अशा स्पर्धांमधून चित्रपटाची मोफत तिकिटं, महागड्या हॉटेलमध्ये जेवणाची संधी आणि अनेक घरगुती गोष्टी नादिनला मिळाल्या आहेत. अशा प्रकारे नादीननं एका वर्षात 8 लाखांहून अधिक रुपयांची बचत केली आहे.
    First published:

    Tags: Money, Savings and investments

    पुढील बातम्या