मुंबई, 11 डिसेंबर: देशात सायबर फ्रॉडच्या (Cyber Fraud Incident) घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. हे फसवणूक करणारे भामटे नवनवीन मार्गाने लोकांना आपल्या फसवणुकीचे बळी बनवत आहेत. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी पंजाब नॅशनल बँक त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सावध करत आहे. PNB ने बुधवारी आणखी एक ट्वीट जारी करून आपल्या करोडो ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पीएनबीने केलं ट्वीट
पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक महत्त्वाचे ट्वीट केले आहे. बँकेने असं म्हटलं आहे की, सण साजरे करण्यासाठी असतात, पश्चाताप करण्यासाठी नसतात. सणासुदीच्या काळात सायबर गुन्हेगार अनेकदा फसवणूक करतात. https://cybercrime.gov.in वर अशा फसव्या मेसेजबाबत तक्रार करा. तुम्ही कशावर विश्वास ठेवताय याबाबत लक्ष ठेवा.
Festivals are for celebration, not for you to regret.
Cybercriminals often do fraud during festivals. Report such incidents of fraudulent messages on https://t.co/qb66kLcXD4. Be mindful of what you believe.#OffersAllTheWay #CISO #CyberSecurity pic.twitter.com/QhLHWOnCBZ — Punjab National Bank (@pnbindia) December 9, 2021
बँकेबाबत कोणत्याही माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर जा
ग्राहकांना फसवण्यासाठी हे भामटे कोणत्याही मार्गाचा अवलंब करतात. पीएनबीच्या म्हणण्यानुसार, यावेळी ग्राहकांना फसवे मेसेज पाठवले जात (fraudulent messages) आहेत की ते मोफत कार घेऊ शकतात. पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना अशा बनावट ईमेल लिंकवर क्लिक करू नये असे सांगितले आहे. पीएनबीने ग्राहकांना बँकेशी संबंधित माहितीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.pnbindia.in ला भेट देण्यास सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.