• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • बँकेत शुन्य बॅलेन्स असतानाही काढू शकणार पैसे, काय आहे प्रोसेस? वाचा सविस्तर...

बँकेत शुन्य बॅलेन्स असतानाही काढू शकणार पैसे, काय आहे प्रोसेस? वाचा सविस्तर...

तुम्ही पगारदार कर्मचारी असाल तर तुम्ही सॅलरी ओव्हरड्राफ्टचा (Salary Overdraft) लाभ घेऊ शकता. या सुविधेचा फायदा कसा करुन घ्यायचा जाणून घेऊया.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑक्टोबर : सध्या सणासुदीचा (Diwali 2021) काळ सुरू असून, या काळात लोकांना पैशांची जास्त गरज असते. विशेषत: जे लोक नोकरीला आहेत आणि त्यांचा महिन्याचा पगार आधीच संपला आहे, अशा परिस्थितीत सण साजरे करण्यात त्यांना अडचणी येतात. अशावेळी लोक त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडून कर्ज (Personal Loan) घेतात. मात्र आता नोकरी करणाऱ्यांना असं करण्याची गरज नाही. कारण त्यांच्या बँकेच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेद्वारे त्यांच्या पैशाची गरज पूर्ण होऊ शकते. जर तुम्हाला कधीही पैशांची (Salary Overdraft) गरज भासली तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आणि तुम्हाला कोणाकडूनही कर्ज घ्यावे लागणार नाही किंवा कर्जासाठी अर्जही करावा लागणार नाही. तुम्ही पगारदार कर्मचारी असाल तर तुम्ही सॅलरी ओव्हरड्राफ्टचा लाभ घेऊ शकता. या सुविधेचा फायदा कसा करुन घ्यायचा जाणून घेऊया. पगार ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? दर महिन्याला तुमचा पगार बँक खात्यात येतो, त्यामुळे तुम्ही बँक खात्यातून ओव्हरड्राफ्टसाठी पात्र आहात की नाही हे तपासू शकता. जर तुम्ही बँकेच्या नियमांनुसार ओव्हरड्राफ्ट घेण्यास पात्र असाल तर तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. सॅलरी ओव्हरड्राफ्ट हा एक प्रकारचा क्रेडिट आहे जो तुम्हाला तुमच्या पगार खात्यावर (Salary Account) मिळतो. जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असेल तेव्हा तुम्ही शून्य शिल्लक असतानाही पगार खात्यातून पैसे काढू शकता. हे आहेत 5 धमाकेदार Focused Mutual Funds, एका वर्षात दिले 80 टक्के रिटर्न! ओव्हरड्राफ्ट हा एक झटपट कर्जाचा (Instant Loan) प्रकार आहे. यावर व्याज आणि प्रक्रिया शुल्क (Procecing Fee) देखील भरावी लागेल. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) इन्स्टा फ्लेक्सी कॅश सुविधा देते आणि ग्राहक ते ऑनलाईन अॅक्टिव्ह करू शकतात. या सुविधेअंतर्गत ग्राहक त्यांच्या पगाराच्या तिप्पट ओव्हरड्राफ्ट घेऊ शकतात. ग्राहक 48 तासांच्या आत ओव्हरड्राफ्ट वापरू शकतात. केसांसाठी खर्च केले तब्बल 35 हजार रुपये; आरशात पाहताच ढसाढसा रडू लागली महिला ओव्हरड्राफ्ट सुविधा कोणाला मिळणार? ओव्हरड्राफ्टची ही सुविधा सर्व बँक ग्राहकांसाठी उपलब्ध नाही. ग्राहक आणि कंपनीचे क्रेडिट प्रोफाइल पाहूनच बँक ओव्हरड्राफ्टची सुविधा देते. जर तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा हवी असेल तर तुम्हाला कस्टमर केअरशी बोलावे लागेल. किती व्याज द्यावं लागणार? जेव्हा अचानक पैशांची गरज भासते त्यावेळी इथेतिथे पेसै मागण्यापेक्षा आपल्या हक्काने पैसे आपल्ल्या ओव्हरड्राफ्टमध्ये मिळू शकतात. यामध्ये तुम्हाला 1 ते 2 टक्के व्याज द्यावे लागते. म्हणजे हे व्याज वार्षिक 12 ते 20 टक्के होते. क्रेडिट कार्ड प्रमाणे यावरही जास्त व्याज आकारलं जातं.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: