मराठी बातम्या /बातम्या /मनी /

हे आहेत 5 धमाकेदार Focused Mutual Funds, एका वर्षात दिले 80 टक्के रिटर्न!

हे आहेत 5 धमाकेदार Focused Mutual Funds, एका वर्षात दिले 80 टक्के रिटर्न!

गेल्या काही दिवसात शेअर बाजारानं (Share Market) उच्चांकी पातळी गाठत गुंतवणूकदारांना (Investors) भरभक्कम नफा मिळवून दिला आहे, पण कमी जोखमीसह चांगल्या परताव्यासाठी म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा एक चांगला गुंतवणूक पर्याय म्हणून झपाट्याने लोकप्रिय होत आहे.

गेल्या काही दिवसात शेअर बाजारानं (Share Market) उच्चांकी पातळी गाठत गुंतवणूकदारांना (Investors) भरभक्कम नफा मिळवून दिला आहे, पण कमी जोखमीसह चांगल्या परताव्यासाठी म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा एक चांगला गुंतवणूक पर्याय म्हणून झपाट्याने लोकप्रिय होत आहे.

गेल्या काही दिवसात शेअर बाजारानं (Share Market) उच्चांकी पातळी गाठत गुंतवणूकदारांना (Investors) भरभक्कम नफा मिळवून दिला आहे, पण कमी जोखमीसह चांगल्या परताव्यासाठी म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा एक चांगला गुंतवणूक पर्याय म्हणून झपाट्याने लोकप्रिय होत आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 31 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसात शेअर बाजारानं (Share Market) उच्चांकी पातळी गाठत गुंतवणूकदारांना (Investors) भरभक्कम नफा मिळवून दिला आहे. अनेक गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे, पण तेजीत असलेला शेअर बाजार कधी गडगडेल सांगता येत नाही. त्यामुळे जास्त नफा कमावण्यासाठी जोखीमही जास्त घ्यावी लागते. मात्र प्रत्येकाला अशी जोखीम (Risk) घेण्याची इच्छा आणि क्षमता नसते. कमी जोखमीसह चांगल्या परताव्यासाठी म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा एक चांगला गुंतवणूक पर्याय म्हणून झपाट्याने लोकप्रिय होत आहे. आजकाल म्युच्युअल फंड इतर कोणत्याही गुंतवणूक योजनेपेक्षा जास्त परतावा देत आहेत. बाजारात सध्या असे अनेक म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत ज्यांनी एका वर्षात 80 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. अशाच काही फोकस्ड इक्विटी फंडांबद्दल (Focused Equity Fund)आम्ही माहिती देणार आहोत, ज्यांनी केवळ एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. फोकस्ड इक्विटी फंड हे फ्लेक्सिकॅप (Flexicap) श्रेणीत येतात. नावाप्रमाणेच, फोकस्ड फंड इतर कोणत्याही योजनांपेक्षा कमी शेअर्समध्ये (Shares) गुंतवणूक करतात आणि म्हणूनच त्यांचे पोर्टफोलिओ फोकस्ड असतात. हे फंड ठराविक 25 ते 30 शेअर्समध्येच गुंतवणूक करतात. हे फंड त्यांच्या मालमत्तेपैकी 5 ते 9 टक्के मालमत्ता रोख (Cash) ठेवतात. त्यामुळे कठीण काळात ते आपली कामगिरी संतुलित ठेवू शकतात. अशा काही फंडांनी गेल्या एका वर्षात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. यामध्ये खालील फंडांचा समावेश आहे. निप्पॉन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड : (Nippon India Focused Equity Fund) व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, निप्पॉन इंडिया फोकस्ड इक्विटी फंडाने गेल्या एका वर्षात 79.9 टक्के परतावा दिला आहे. हा फंड 5.818 कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करतो. थेट योजनांसाठी त्याचे खर्चाचे प्रमाण 1.32 टक्के आहे. निप्पॉन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड हा फायनान्शिअल स्टॉक फंडाचा टॉप सेक्टर होल्डिंग आहे. सेवा (Service), एफएमसीजी (FMCG) आणि बांधकाम क्षेत्रात या फंडांची गुंतवणूक 10 टक्क्यांपेक्षा कमी असते. फ्रँकलिन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड : (Franklin India Focused Fund ) डेट फंडाच्या (Debt Fund) आघाडीवर गेल्या एका वर्षात अनेक चढ-उतार पाहिले आहेत, परंतु फ्रँकलिन इंडिया फोकस्ड इक्विटी फंडाने गेल्या एका वर्षात 79.8 टक्के परतावा दिला आहे. या फंडाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. हा फंड 7,836 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करतो. त्याचे खर्चाचे प्रमाण 1.12 टक्के आहे. या फंडाने आर्थिक क्षेत्रातील अधिक जोखमीच्या शेअर्ससह बांधकाम आणि ऊर्जा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे. एचडीएफसी फोकस 30 :(HDFC Focus 30) एचडीएफसी फोकस्ड इक्विटी फंडाने गेल्या एका वर्षात 78.5 टक्के परतावा दिला आहे. या योजनेच्या व्यवस्थापनाखाली 838 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. या फंडाद्वारे 1.37 टक्के शुल्क आकारले जाते. इतर फोकस्ड फंडाच्या तुलनेत या फंडाकडे 8-9 टक्के जास्त रोख रक्कम आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड इक्विटी फंड :(ICICI Prudential Focused Fund) आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड इक्विटी फंडाने गेल्या एका वर्षात 69.5 टक्के परतावा दिला आहे. हा फंड 2,256 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करते. याचे खर्चाचे प्रमाण 0.81 टक्के आहे. इतर फोकस्‍ड फंडांनी ज्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे, त्यासह या फंडाने तंत्रज्ञान क्षेत्रातही गुंतवणूक केली आहे. यामध्ये धोका अधिक असतो. एसबीआय फोकस्ड इक्विटी फंड : (SBI Focused Equity Fund) एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाने गेल्या एका वर्षात 67.7 टक्के परतावा दिला आहे. हे फंड हाउस 20,372 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करते. याचे खर्चाचे प्रमाण 0.72 टक्के आहे. या फंडाने वित्तीय शेअर्स, एफएमजीसी (FMCG)आणि आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. न्यूज 18 (News18) कोणत्याही फंडात गुंतवणूक करण्याची शिफारस करत नाही,पण गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये फोकस्ड फंडांसाठी जागा ठेवली पाहिजे. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वेळ आणि बाजाराची परिस्थिती, फंड हाऊसचा इतिहास आणि त्याचे व्यवस्थापन, तुमची जोखीम घेण्याची क्षमता इत्यादींचा अभ्यास करा. यासाठी तुम्ही सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता.
First published:

Tags: Mutual Funds, Share market

पुढील बातम्या