• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • सुरू करा हा दमदार नफ्याचा व्यवसाय, 9 लाखांपर्यंत कमाई, सरकारही करेल मदत

सुरू करा हा दमदार नफ्याचा व्यवसाय, 9 लाखांपर्यंत कमाई, सरकारही करेल मदत

देशभरात प्रदूषण (pollution) वाढत असल्याने केंद्र सरकारने प्लॅस्टिकवर (plastic ban) बंदी घातली आहे. अशात तुम्ही पेपरचा व्यवसाय (paper business) सुरू करू शकता. सध्या या व्यवसायाला चांगली मागणी आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 जून: देशभरात प्रदूषण (pollution) वाढत असल्याने केंद्र सरकारने प्लॅस्टिकवर (plastic ban) बंदी घातली आहे. अशात तुम्ही पेपरचा व्यवसाय (paper business) सुरू करू शकता. सध्या या व्यवसायाला चांगली मागणी आहे. याशिवाय या व्यवसायामध्ये कमी पैसे खर्च करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. महत्वाचं म्हणजे पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग यूनिट (Paper Cup Manufacturing Unit ) उभारण्यासाठी सरकार मुद्रा योजनेच्या माध्यमातून मदत करत आहे. तसेच केंद्र सरकारकडून या संदर्भात एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आलाय. त्यामध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी लागणाऱ्या खर्चापासून ते नफ्यापर्यंत सर्व सविस्तर माहिती दिली आहे. पेपर बिझनेस उभारण्यासाठी तुम्हाला 500 स्क्वेअर फूट जागा लागेल. मशीनरी, इक्विपमेंट, फिस इक्विपमेंट आणि फर्निचर, डाय, इलेक्ट्रिफिकेशन, इंस्टॉलेशन आणि प्री ऑपरेटिव्ह खर्चासाठी 10 लाख 70 हजार रुपये खर्च येईल. कामगारांना दिला जाणारा पगार जर तुम्ही तुमच्या इथे स्किल्ड आणि अनस्किल्ड दोन्ही प्रकारचे कामगार कामावर ठेवत असाल तर तुम्हाला यासाठी महिन्याला जवळपास 35 हजार रुपये खर्च येईल. रॉ मटेरियलचा खर्च : 3.75 लाख रुपये यूटिलिटीजचा खर्च : 6000 रुपये इतर खर्च : 20,500 रुपये किती नफा कमवू शकता? जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि वर्षातील किमान 300 दिवस काम केल्यास तुम्ही 300 दिवसांत 2.20 कोटी यूनिट पेपर कप तयार करू शकता. याशिवाय तुम्ही प्रति कप किंवा ग्लास जवळपास 30 पैसे या हिशोबाने विकू शकता. सरकार करणार मदत पेपर बिझनेस सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेतर्फे मदत केली जाते. म्हणजेच तुम्ही लोन घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. मुद्रा लोन योजनेमार्फत सरकार व्याजावर सब्सिडी देते. या योजनेच्या माध्यमातून प्रोजेक्टच्या पूर्ण खर्चापैकी केवळ 25 टक्के खर्च तुम्हाला करावा लागेल. उर्वरित 75 टक्क्यांचं लोन तुम्हाला मुद्रा योजनेच्या माध्यमातून सरकार देईल. व्यवसायासाठी लागणारी मशिन कुठे मिळणार? कागदाचे कप बनवण्याची मशिन दिल्ली, हैदराबाद, आग्रा आणि अहमदाबादसह अनेक मोठ्या शहरात मिळते. यासारखी मशिन तयार करण्याचं काम इंजीनिअरिंग काम करणाऱ्या कंपन्या करतात.
  First published: