मराठी बातम्या /बातम्या /मनी /या व्यवसायात पहिल्या महिन्यापासूनच होईल बक्कळ कमाई; सरकारकडूनही मिळेल मदत

या व्यवसायात पहिल्या महिन्यापासूनच होईल बक्कळ कमाई; सरकारकडूनही मिळेल मदत

टेक्नोलॉजीच्या काळात आता देशातील शेतकरी पारंपरिक शेतीमध्ये नव-नवे प्रयोग करत आहे आणि यातून फायदाही होतो आहे. अनेक शिकलेल्या तरुणांनीही ही शेती सुरू केली असून यातून एक लाखापर्यंतची चांगली कमाई करत आहेत.

टेक्नोलॉजीच्या काळात आता देशातील शेतकरी पारंपरिक शेतीमध्ये नव-नवे प्रयोग करत आहे आणि यातून फायदाही होतो आहे. अनेक शिकलेल्या तरुणांनीही ही शेती सुरू केली असून यातून एक लाखापर्यंतची चांगली कमाई करत आहेत.

टेक्नोलॉजीच्या काळात आता देशातील शेतकरी पारंपरिक शेतीमध्ये नव-नवे प्रयोग करत आहे आणि यातून फायदाही होतो आहे. अनेक शिकलेल्या तरुणांनीही ही शेती सुरू केली असून यातून एक लाखापर्यंतची चांगली कमाई करत आहेत.

नवी दिल्ली, 21 मार्च : नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. स्ट्रॉबेरीची शेती करुन (Strawberry Cultivation) लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. यासाठी केवळ एक एकर जमीन असणं आवश्यक आहे. टेक्नोलॉजीच्या काळात आता देशातील शेतकरी पारंपरिक शेतीमध्ये नव-नवे प्रयोग करत आहे आणि यातून फायदाही होतो आहे. अनेक शिकलेल्या तरुणांनीही ही शेती सुरू केली असून यातून एक लाखापर्यंतची चांगली कमाई करत आहेत.

काय आहे मार्केट डिमांड?

स्ट्रॉबेरीची शेती, याची लागवड एक आधुनिक शेती आहे आणि यात खर्चही तुलनेने कमी होतो. सिंचनाची कमी गरज असते. कृषी जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रॉबेरी औषधीय असून यात अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, जे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरतात. यात व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन K असतं. हे डोळ्यांचं आरोग्य राखण्यासह, दातांची चमक वाढवण्यासाठीही फायद्याचं ठरतं. स्ट्रॉबेरीपासून जेली, मिठाई, आईस्क्रिमचीही निर्मिती केली जाते. त्यामुळे याचं बाजारमूल्यही अधिक आहे.

(वाचा - Gram Ujala Scheme: 3 वर्षांच्या वॉरंटीसह, केवळ 10 रुपयांत मिळेल LED बल्ब)

कशी कराल शेती?

भारतात याचं उत्पादन डोंगराळ भागात नैनिताल, डेहरादून, हिमाचल प्रदेश, महाबळेश्वर, महाराष्ट्र, निलगिरी, दार्जिलिंगमध्ये व्यावसायिकदृष्ट्या केलं जातं. स्ट्रॉबेरीसाठी चिकणमाती चांगली मानली जाते. स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा योग्य कालावधी 10 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत असतो. यासाठी तापमान 30 डिग्रीहून अधिक असू नये. एक एकर जागेतून याची शेती केली जाऊ शकते. पॉली हाउस तंत्रापेक्षा, थंड हवामान स्ट्रॉबेरी लागवडीसाठी उत्तम आहे. परंतु अपुऱ्या स्त्रोतांमध्ये पीक सुरक्षित ठेवण्यासाठी, उन्हापासून वाचवणाऱ्या पॉली टनल पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो. दररोज प्लांटमध्ये साफ-सफाई करावी लागते. रोपांसाठी ठिंबक सिंचन करावं लागतं.

(वाचा - कमाई करण्यासाठी BEST पर्याय, 5000 रुपये गुंतवणून लाखो मिळवा; सरकारही करेल मदत)

रोपं कुठे खरेदी करता येतील आणि याचं मार्केटिंग कसं कराल?

पुण्यातील केएफ बायोप्लान्ट्स प्रायव्हेट लिमिटेडमधून रोपं खरेदी करता येऊ शकतात. हिमाचल प्रदेशातूनही या रोपांची खरेदी केली जाऊ शकते. विक्रीच्या बाबतीत स्ट्रॉबेरीची विक्री लवकर होते, कारण याची मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे. बाजारात 300 ते 600 रुपयांपर्यंत याची विक्री होते. याचे खरेदीदारही लागवड केल्यानंतर लगेच मिळू शकतात आणि यासाठी अॅडव्हान्स बुकिंगही घेता येतं. एकूण किंमत कितीही असली तरी त्या किंमतीच्या 3 पट रक्कम सहजपणे मिळते, असं कृषी जाणकारांचं म्हणणं आहे.

सरकारकडून मिळेल मदत -

या व्यवसायासाठी वेगवेगळ्या राज्यात फलोत्पादन आणि कृषी विभागाकडून अनुदानदेखील मिळतं. ज्यात प्लॅस्टिक मल्चिंग आणि ठिंबक सिंचनासाठीच्या यंत्रांवर 40 ते 50 टक्के अनुदान मिळतं. आपल्या राज्यानुसार याच्या व्यवसायासाठी कृषी विभागाकडून मदत मिळवू शकता.

First published:

Tags: Start business