नवी दिल्ली, 22 जून: तुमच्याकडे एक रुपयाची नोट (One Rupee Note) आहे का? मग तुम्ही घरबसल्या लखपती होऊ शकता. एक रुपयाची ही नोट तुमच्याकडे असेल, तर तुमच्यासाठी कमाई करण्याची चांगली संधी आहे. कारण ही नोट ऑनलाइन विकून (Online) तुम्ही एक लाख रुपये मिळवू शकता; मात्र ती खास नोट तुमच्याकडे असली पाहिजे. अशा पाच नोटा तुमच्याकडे असतील, तर पाच लाख रुपये मिळालेच म्हणून समजा. त्यासाठी तुम्हाला त्या खास नोटेचा फोटो वेबसाइटवर टाकावा लागेल. त्यानंतर लोक तुमच्याकडच्या नोटेसाठी बोली लावतील आणि तुम्हाला योग्य वाटेल त्या व्यक्तीला नोट विकून तुम्ही लाखो रुपये मिळवू शकता. सध्या अशा अनेक वेबसाइट्स आहेत, की ज्यावर जुन्या नोटा आणि नाण्यांची (Coins) खरेदी-विक्री केली जात आहे. तुमच्याकडे असलेल्या नोटा आणि नाणी ठरवलेल्या निकषांनुसार असतील, तर तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. इंडियामार्टवर या जुन्या नोटा घरबसल्या चांगल्या किमतीला विकल्या जाऊ शकतात. तसंच खाली दिलेल्या वेबसाइट्सवरही नोटा आणि नाण्यांची विक्री केली जाऊ शकते. तिथे या नोटा-नाण्यांचा लिलाव होतो. त्यात बोली लागते आणि योग्य किमतीला तुम्ही विक्री करू शकता. https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/ http://www.indiancurrencies.com/ एक रुपयाच्या नोटेचं वैशिष्ट्य एक रुपयाच्या नोटेची गोष्ट वेगळी आहे. कारण ही नोट भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) जारी केली जात नाही. ती नोट भारत सरकारकडून जारी केली जाते. त्यामुळेच एक रुपयाच्या नोटेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची (Governor) सही असत नाही. त्या नोटेवर केंद्रीय वित्त सचिवांची (Finance Secretary) स्वाक्षरी असते. म्हणून ही नोट वैशिष्ट्यपूर्ण असते. हे वाचा- Gold Price Today: 9000 रुपये कमी दराने खरेदी करा सोनं,इथे तपासा प्रति तोळाचा भाव एक रुपयाच्या पहिल्या नोटेचं मुद्रण 30 नोव्हेंबर 1917 रोजी झालं होतं. त्या नोटेवर किंग जॉर्ज पंचमचा फोटो होता. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार 1926मध्ये पहिल्यांदा एक रुपयाच्या नोटेची छपाई बंद झाली होती. 1940मध्ये ती छपाई पुन्हा सुरू झाली. त्यानंतर 1994मध्ये ही छपाई पुन्हा बंद करण्यात आली. त्यानंतर 2015मध्ये एक रुपयाच्या नोटेची छपाई पुन्हा सुरू करण्यात आली. एक रुपयाच्या वैशिष्ट्यपूर्ण नोटेच्या विक्रीबद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी https://dir.indiamart.com/impcat/antique-note.html या लिंकवर भेट द्यावी. हे वाचा- 1 जुलैपासून हे आर्थिक नियम बदलणार, तुमच्या जीवनावर करणार थेट परिणाम सध्या ई-कॉमर्स वेबसाइटवर वैशिष्ट्यपूर्ण नोटा, नाण्यांच्या विक्रीतून पैसे मिळत आहेत. माता वैष्णोदेवीची प्रतिमा असलेली पाच आणि 10 रुपयांची नाणी तुमच्याकडे असतील, तर ती विकून तुम्हाला पैसे मिळू शकतील. ही नाणी 2002मध्ये जारी करण्यात आली होती. वैष्णोदेवीची प्रतिमा असल्याने लोक या नाण्यांना लकी मानत आहेत. त्यामुळेच या प्रकारच्या नाण्यांसाठी लाखो रुपये मोजायलाही काही लोक तयार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.