Home /News /money /

कोरोनामुळे जगभरातील अब्जाधीशांचे 7 दिवसात बुडले 31.52 लाख कोटी, सर्वसामान्यांनाही बसणार झळ

कोरोनामुळे जगभरातील अब्जाधीशांचे 7 दिवसात बुडले 31.52 लाख कोटी, सर्वसामान्यांनाही बसणार झळ

कोरोना वायरसमुळे (Coronavirus) जगभरातील इक्विटी मार्केटवर त्याचा परिणाम झाला आहे. शेअर मार्केटमध्ये सुद्धा कोरोनाच्या परिणामुळे अस्थिरता पाहायला मिळते आहे. याचा परिणाम जगभरातील अब्जाधीशांवर झाला आहे. त्याचप्रमाणे जागतिक मंदी आणि कोरोनाचं संकट यामुळे सामान्य नागरिकही भरडला जाणार आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 29 फेब्रुवारी :  कोरोना वायरसमुळे (Coronavirus) जगभरातील इक्विटी मार्केटवर त्याचा परिणाम झाला आहे. शेअर मार्केटमध्ये सुद्धा कोरोनाच्या परिणामुळे अस्थिरता पाहायला मिळते आहे. याचा परिणाम जगभरातील अब्जाधीशांवर झाला आहे. भारतातील मोठमोठ्या कंपन्यांच्या उत्पन्नामध्येही घसरण झाली आहे. ज्याप्रमाणे जगभरातील अब्जाधीस कोरोना व्हायरसचे परिणाम भोगत आहेत, त्याचप्रमाणे सामान्यांनाही येणाऱ्या काळात तोटा सहन करावा लागणार आहे. जगभरातील अब्जाधीशांवर परिणाम ब्लूमबर्गच्या अहवालानूसार, जगभरातील पहिल्या 500 अब्जाधीशांना गेल्या 7 दिवसात जवळपास 444 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 31.52 लाख कोटी रुपये) तोटा झाला आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 2008 मध्ये आलेल्या आर्थिक संकटानंतर (2008 Financial Crisis) पहिल्यांदाच स्टॉक मार्केटमध्ये एवढी मोठी घसरण झाली आहे. 2008 च्या आर्थिक संकटादरम्यान जगभरातील मार्केटमध्ये जवळपास 6 लाख कोटी डॉलर बुडाले होते.  यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पहिल्या 500 अब्जाधीशांचे सुमारे 78 अब्ज डॉलरचा (सुमारे 5.53 लाख कोटी रुपये) फायदा झाला होता. मात्र फायद्यापेक्षा 7 दिवसात झालेला तोटा कित्येक पटींने जास्त आहे.  टॉप 3 अब्जाधीश असणारे अॅमॅझॉनचे के. जेफ. बेजोस, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि एलवीएमएसचे बर्नार्ड एरनॉल्ट यांच्या संपत्तीमध्ये 30 अब्ज डॉलर (सुमारे 2.21 लाख कोटी रुपये) रुपयांची घसरण झाली आहे. भारतीय अब्जाधीशांवर होणारा परिणाम भारतीय स्टॉक मार्केटमध्ये आयटी सेक्टर (IT Sector)मधील कंपन्यांच्या प्रोमोटर्सच्या संपत्तीमध्ये मोठी घसरण झाली आहे.  HCL, विप्रो आणि इन्फोसिस यांच्या प्रमोटर्सची संपत्ती 2 दिवसात 3.2 अब्ज डॉलरची (जवळपास 22 हजार 720 कोटी रुपये) घसरण झाली आहे. TCS सुद्धा या यादीमध्ये जोडल्यास ही रक्कम वाढून 9 अब्ज डॉलर होत आहे. . भारतीय बाजारात सर्वाधिक नुकसान एचसीएलचे शिव नादर आणि विप्रोचे अजीम प्रेमजी यांचं झालं आहे. या दोघांच्या संपत्तीमध्ये क्रमश: 1.6 अब्ज डॉलर आणि 1.4 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. याव्यतिरिक्त कुमार मंगलम बिर्ला, उदय कोटक यांच्या कंपनीचही नुकसान झालं आहे. सामान्यांवर काय परिणाम होणार? कोरोना व्हायरसचा जगभरातल्या व्यापारावर परिणाम झालाय. त्यातच आता कोरोना व्हायरसमुळे भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार आहेत. भारतात चीन आणि दक्षिण कोरिया या देशांतून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात होते. या आयातीवरही कोरोना व्हायरसचा परिणाम झालाय आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूही महाग झाल्या आहेत. स्मार्टफोन, टीव्ही, रेफ्रिजरेटर, या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार आहेत. या वस्तूंचा पुरवठा कमी होऊ शकतो किंवा या वस्तूंच्या दरात 10 ते 15 टक्क्यांची वाढ होऊ शकते. मार्चमध्ये फ्रिज, एसी त्याचप्रमाणे टिव्ही सेटच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आयफोनच्या पुरवठ्यावर देखील मोठा परिणा होणार आहे. (हेही वाचा-सुवर्णसंधी! सोनं आणखी 2000 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता) त्याचप्रमाणे यावर्षी जागतिक मंदीची परिस्थिती असल्यामुळे गेल्या काही वर्षांतील सर्वात कमी यावर्षी पगारवाढ होणार आहे. अशा परिस्थितीत Coronavirus मुळे आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घसरणीमुळे सामान्यांच्या खिशाला चाप बसण्याची शक्यता आहे. तसंच  शेअर बाजारानंतर जगभरातील सोन्याच्या किंमतीमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार Coronavirus मुळे जागतिक व्यावारावर परिणाम करणाऱ्या अनेक व्यवसायातील उपक्रम कमी झाले आहेत. व्यवसायांतील देवाणघेवाण कमी झाली आहे. त्यामुळे शेअर बाजारात घसरण झाली आहे. परिणामी झालेला तोटा भरून काढण्यासाठी गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री केली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या