लॉकडाऊमुळे सेलिब्रिटी शेफ पूजा धिंग्राला मोठा फटका, दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध कॅफे बंद करण्याचा निर्णय

लॉकडाऊमुळे सेलिब्रिटी शेफ पूजा धिंग्राला मोठा फटका, दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध कॅफे बंद करण्याचा निर्णय

लॉकडाऊनमुळे (Lockdown) तर हॉटेल व्यवसायाचे कंबरडं मोडलं आहे. या परिस्थितीत प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पूजा ढिंगराने तिचा कॅफे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 02 मे : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशातील अनेक व्यावसायांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे (Lockdown) तर हॉटेल व्यवसायाचे कंबरडं मोडलं आहे.  मोठमोठ्या व्यावसायिकांना देखील या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पूजा ढिंगराने तिचा कॅफे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 10 वर्षांपासून पूजा मुंबईतील कुलाबा याठिकाणी Le 15 हा कॅफे चालवते. मात्र आता लॉकडाऊनमुळे तिने हा कॅफे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने याबाबत माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

April was anything but easy. I’ve had to make some tough (and heartbreaking) decisions this past month. Thank you for giving our baby so much love ❤️ Thank you for letting me tell my story @diviathani @cntravellerindia. Link in my bio

A post shared by Pooja Dhingra 🗻 (@poojadhingra) on

पूजा ढिंगराने तिच्या इन्स्टाग्रामवर म्हटले आहे की, एप्रिल महिना माझ्यासाठी सोपा नव्हता. या काळात मला काही कठीण निर्णय घ्यावे लागले. माझ्या कॅफेला एवढं प्रेम देण्यासाठी  धन्यवाद आणि माझी कहाणी सांगू देण्यासाठी देखील धन्यवाद. पूजाने एका ब्लॉगच्या माध्यमातून तिची आणि तिच्यासाठी एखाद्या बाळाप्रमाणे असणाऱ्या ले15 कॅफेची कहाणी सांगितली आहे.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये 'या' बँकेचा परवाना रद्द, लाखो खातेधारकांना RBIचा झटका)

दरम्यान कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे पर्यटन, एव्हिएशन, वाहतूक या सर्वांवरच परिणाम झाला आहे. परिणामी हॉटेल व्यवसायातील प्रत्येक जण त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: May 2, 2020, 12:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या