मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

EV Range: लाँग ड्राईव्हलाही वापरू शकता इलेक्ट्रिक कार, फक्त लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

EV Range: लाँग ड्राईव्हलाही वापरू शकता इलेक्ट्रिक कार, फक्त लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

EV Range: लाँग ड्राईव्हलाही वापरू शकता इलेक्ट्रिक कार, फक्त लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

EV Range: लाँग ड्राईव्हलाही वापरू शकता इलेक्ट्रिक कार, फक्त लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Electric Car Range Tips: इलेक्ट्रिक कार आता केवळ शहरातील प्रवासासाठीच नव्हे तर महामार्गांवर जास्त अंतरावरील प्रवास करण्यासाठीदेखील एक चांगला पर्याय बनला आहे. इलेक्ट्रिक कारचा प्रवास हा परवडणारा तसेच आरामदायी असतो. कमी चार्जिंग स्टेशनमुळं अनेकवेळा समस्या येत असली तरी काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही ही समस्या टाळू शकता.

पुढे वाचा ...
मुंबई, 18 सप्टेंबर: इलेक्ट्रिक वाहनांबद्दल एक गोष्ट सातत्यानं म्हटली जाते की त्या सिटी राइड कार आहेत, परंतु असं अजिबात नाही. आता बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक कारची रेंज चांगली आहे. लांबच्या राइड्स दरम्यान किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये प्रवास करताना चार्जिंगची समस्या उद्भवू शकते, परंतु काही गोष्टी लक्षात ठेवल्यास या समस्या टाळता येऊ शकतात आणि तुम्ही या समस्येवर मात करू शकता. तसे आजकाल अनेक महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करण्याची सुविधा झाली आहे आणि सरकारही यासाठी सतत काम करत आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, सरकार विद्युत महामार्गाच्या प्रकल्पावर काम करत आहे. त्याच वेळी, रेस्टॉरंट आणि मोटेल ऑपरेटर्सनी मोठ्या शहरांमधील लोकांना सुविधा देण्यासाठी त्यांच्या मालमत्तांवर चार्जिंग पॉइंट देखील स्थापित केले आहेत. या गोष्टींची घ्या विशेष काळजी:
  • कोणत्याही लांबच्या राइडवर जाण्यापूर्वी कार पूर्णपणे चार्ज करा.
  • गाडी योग्य रितीनं चालवा, जोरजबरदस्तीनं गाडी चालवू नका, असं केल्यानं चार्जिंग लवकर संपते.
  • गरज नसल्यास एसी वापरू नका किंवा कमी वापर करा.
  • लांबचं अंतर कापायचं असल्यास रात्रीचा प्रवास टाळा, रात्रीच्या वेळी हेडलाइट्समुळे चार्जिंग लवकर करावं लागतं.
  • तुम्ही जर डोंगराळ भागामध्ये प्रवास करत असाल तर चार्जिंग पॉईंट्सची माहिती आधीच घ्या आणि पूर्ण चार्ज करूनच प्रवासाला सुरुवात करा.
  • ईव्ही कंपन्या वाहनासोबत 15 व्होल्टचा नॉर्मल सॉकेट चार्जर देखील देतात, तो तुमच्यासोबत ठेवा. चार्ज होण्यास थोडा वेळ लागेल पण त्यामाध्यमातून तुम्ही तुमची गाडी चार्ज करू शकाल.
हेही  वाचा: Flying Bike: जगातील पहिली उडणारी बाईक लाँच; वेग तब्बल 100 किमी/तास; काय आहे किंमत?
  • एक्स्टेंशन कॉर्ड नेहमी सोबत ठेवा.
  • तुम्ही ज्या कंपनीची EV वापरत आहात, त्या कंपनीचे अॅप डाउनलोड करणं आवश्यक आहे, कारण त्यावरच तुम्हाला चार्जिंग पॉइंट्सची माहिती मिळेल.
  • वाटेत वाहन चार्ज करण्याची गरज भासल्यास ते पूर्णपणे चार्ज करू नका, 80 टक्के चार्ज केल्यानंतर वाहन पूर्णपणे चार्ज होण्यासाठी बराच वेळ लागतो. वेळेची बचत करण्यासाठी 80 टक्के चार्ज करा आणि तुमच्या नियोजित स्थळी पोहोचल्यावर वाहन पूर्णपणे चार्ज करा.
  • गाडीला टॉप स्पीड लिमिटवर नेऊ नका, गाडी सरासरी वेगानं चालवा. असं केल्यानं चार्जिंग जास्त काळ टिकेल.
वॉलेट आणि UPI: ईव्ही चार्जिंग स्टेशन काही ठिकाणी शुल्क आकारले जातात परंतु तेथे तुम्ही रोख किंवा कार्डद्वारे पेमेंट करू शकत नाही. ते पूर्णपणे UPI अॅप आणि ई-वॉलेटवर अवलंबून आहेत. यासाठी तुम्हाला नेहमी तुमच्या फोनमध्ये UPI अॅप किंवा ई-वॉलेट ठेवावे लागेल. अशा प्रकारे, तुम्ही पैसे देऊन तुमची कार सहज चार्ज करू शकता.
First published:

Tags: Electric rickshaw, Electric vehicles

पुढील बातम्या