मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'ती' आली आणि तिने नदीत उडी मारली, लगेच 4 तरुणांनीही टाकल्या उड्या, अकोल्यातील थरारक घटना

'ती' आली आणि तिने नदीत उडी मारली, लगेच 4 तरुणांनीही टाकल्या उड्या, अकोल्यातील थरारक घटना

पूर्णा नदीच्या पुलावर आली,  तिथे उपस्थित असलेल्या कोणाच्या काहीही लक्षात येण्यापूर्वी त्या महिलेने पुलावरून नदीच्या मधोमध उडी मारली.

पूर्णा नदीच्या पुलावर आली, तिथे उपस्थित असलेल्या कोणाच्या काहीही लक्षात येण्यापूर्वी त्या महिलेने पुलावरून नदीच्या मधोमध उडी मारली.

पूर्णा नदीच्या पुलावर आली, तिथे उपस्थित असलेल्या कोणाच्या काहीही लक्षात येण्यापूर्वी त्या महिलेने पुलावरून नदीच्या मधोमध उडी मारली.

अकोला, 10 सप्टेंबर : "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" असं आपण नेहमी म्हणत असतो आणि अशा घटना पाहत असतो. अशीच एक घटना अकोल्यात घडली आहे.  रागाच्या भरात शुल्लक कारणावरून अकोल्यातील (akola) एका महिलेने गांधीग्राम येथील पूर्णा नदीत (purna river) उडी घेऊन आत्महत्येचा ( commit suicide ) प्रयत्न केला. नशीब बलवत्तर म्हणून काही युवकांच्या प्रसंगावधनाने त्या महिलेचे प्राण वाचले.

आजकाल थोड्या प्रमाणात जरी वाद विवाद झाला तरी मागचा पुढचा विचार न करता डोक्यामध्ये आलेला विचार कृतीत आणून जीवाचा त्याग करण्याची प्रवृत्ती वाढत चालली असून शिघ्र कोपी आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अकोल्यातील अकोट महामार्गावरील गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पुलावरून एका महिलेने पाण्याच्या प्रवाहात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असतांना युवकांच्या प्रसंगावधानाने आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिलेचे सुदैवाने प्राण वाचले आहेत.

वीज कोसळून 110 शेळ्या आणि मेंढ्याचा मृत्यू, गडचिरोलीतील धक्कादायक घटना

आगर येथील एक महिला शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबरला 11 वाजताच्या सुमारास दहिहांडा पोलीस स्टेशन हद्दीतील गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावर आली,  तिथे उपस्थित असलेल्या कोणाच्या काहीही लक्षात येण्यापूर्वी त्या महिलेने पुलावरून नदीच्या मधोमध उडी मारली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

त्याचवेळी ही बाब गांधीग्राम येथील काही युवकांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विचार न करता एका मागोमाग नदीत उड्या मारल्या व त्या महिलेला पाण्यातून बाहेर काढले. यामध्ये हिरा धुरदेव, दीपक धरदेव, लखन धुरदेव, विजय गवई, यांनी मोठ्या धाडसाने प्रयत्न करून महिलेचे प्राण वाचविले आहेत. त्यांच्या या धाडसाने सर्वत्र कौतुक होत आहे.

उत्तराखंडमध्ये निसर्गाचा प्रकोप, डोंगरांवरून कोसळणाऱ्या दगडांमुळे हायवे ठप्प

सदर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. नंतर पोलिसांनी दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चोहट्टा पोलीस चौकी येथे महिला व त्यांच्या नातेवाईकांना समज देऊन सोडून दिले. महत्वाचं म्हणजे, कौटुंबिक कलह किंवा इतर गोष्टींचा ताण हा सर्वांनाच असतो. मात्र याचा उपाय म्हणून आत्महते सारखं टोकाचं पाऊल उचलने योग्य नाही तर त्यातून योग्य मार्ग काढणे महत्वाचे आहे.

First published:
top videos