मुंबई, 7 मार्च : बँक एफडीच्या (Bank Fixed Deposit) घटत्या व्याजदरामुळे लोक गुंतवणुकीचे इतर पर्याय (Investment Option) शोधत आहेत. आर्थिक अस्थिरतेच्या काळात लोक सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतात. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्या कामी येऊ शकतात. येथील गुंतवणूकही सुरक्षित आहे आणि परतावाही जास्त आहे. आम्ही येथे अशा काही पोस्ट ऑफिस योजनांची चर्चा करत आहोत जिथे बँक एफडीहून अधिक परतावा दिला जातो. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (National Saving Certificate) » तुम्हाला NSC मधील गुंतवणुकीवर 8% वार्षिक व्याज मिळत आहे. » व्याज फक्त वार्षिक आधारावर मोजले जाते. परंतु ही रक्कम तुम्हाला कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळते. » तुम्ही किमान 1000 रुपयांची गुंतवणूक देखील करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. » अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने NSC खाते उघडता येते आणि 3 प्रौढांच्या नावाने संयुक्त खाते उघडता येते. » या योजनेची खास गोष्ट म्हणजे 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले देखील पालकांच्या देखरेखीखाली हे खाते उघडू शकतात. » या योजनेअंतर्गत, तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर वाचवू शकता. शेअर बाजार 7 महिन्यांच्या खालच्या पातळीवर, या पडझडीत तज्ज्ञांनी सुचवलेले टॉप पिक्स; चेक करा मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme) » या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदारांना मासिक एक निश्चित रक्कम कमाईची संधी मिळते. » या योजनेत, तुम्हाला एकरकमी रक्कम एकाच किंवा संयुक्त खात्यात जमा करावी लागेल. त्यानंतर या रकमेनुसार दर महिन्याला तुमच्या खात्यात पैसे येतात. » येथे तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त 5 लाख रुपये जमा करू शकता, तर जर संयुक्त खाते असेल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करता येतील. » या योजनेतील मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. » या योजनेअंतर्गत 6.6 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. ATM मधून पैसे काढताना Green Light कडे लक्ष द्या, अन्यथा रिकामं होईल बँक अकाउंट किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) » KVP या योजनेत किमान गुंतवणूक रक्कम 1000 आहे. » गुंतवणूक करण्यासाठी वय 18 वर्षे असावे. अल्पवयीन मुले गुंतवणूक करू शकतात परंतु पालकांच्या देखरेखीखाली ते करता येईल. » सध्या या योजनेत 9 टक्के व्याज दिले जात आहे. » एकल खाते आणि संयुक्त खात्याची सुविधा आहे. » अडीच वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. गुंतवणुकीची रक्कम काढण्यासाठी तुम्हाला 5 वर्षे वाट पाहावी लागेल. » कलम 80C अंतर्गत प्राप्तिकरातही सवलत मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.