• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • दररोज फक्त 167 रुपये बचत करून कोट्यधीश होण्याची संधी; जाणून घ्या या स्कीमबाबत

दररोज फक्त 167 रुपये बचत करून कोट्यधीश होण्याची संधी; जाणून घ्या या स्कीमबाबत

SIP मध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो. कारण चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळू शकतो. एखाद्या गुंतवणूकदाराने 15 ते 20 वर्षं गुंतवणूक केली, तर त्यात फायदा होण्याचं प्रमाण जास्त असतं आणि जास्त परतावा मिळू शकतो.

  • Share this:
नवी दिल्ली, 27 एप्रिल : कोट्यधीश बनण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, पण ते तितकं सोपं नसतं. ज्यांचं मासिक वेतन किंवा उत्पन्न कमी आहे, त्यांच्यासाठी तर ते अधिक कठिण ठरतं. पण हे शक्य होऊ शकतं. गुंतवणुकीची रक्कम कमी असली, तरी गुंतवणूक कुठे करतो, याला महत्त्व आहे. दिवसाला 167 रुपये गुंतवणूक करूनही कोट्यधीश होणं शक्य आहे. म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (Systematic Investment Plan- SIP) गुंतवणूक केल्यास हे शक्य आहे. इतक्या कमी रकमेच्या गुंतवणुकीतून कोट्यधीश कसं होता येईल, जाणून घ्या... SIP मध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो. कारण चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळू शकतो. एखाद्या गुंतवणूकदाराने 15 ते 20 वर्षं गुंतवणूक केली, तर त्यात फायदा होण्याचं प्रमाण जास्त असतं आणि जास्त परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी (SIP)करताना ठरावीक कालावधीपर्यंतच गुंतवणूक (Investment) करणं बंधनकारक नसतं. तुम्हाला वाटेल त्या क्षणी तुम्ही गुंतवणूक थांबवू शकता. असं केलं तरी कोणताही दंड भरावा लागत नाही. दररोज 167 रुपये, म्हणजे महिन्याला पाच हजार रुपये झाले. हे पाच हजार रुपये तुम्हाला चांगल्या म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये एसआयपीद्वारे गुंतवावे लागतील. तुमचा पोर्टफोलिओ वर्षाला 12टक्के परतावा (Returns) देत असेल, तर 28 वर्षांत तुम्हाला 1.4 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळू शकेल. 30 वर्षांत ही गुंतवणूक 1.8 कोटी रुपयांवर, तर 35 वर्षांत ती 3.24 कोटी रुपयांवर जाईल. यात एक महत्त्वाची गोष्ट अशी, की तुम्हाला गुंतवणुकीवर कायम नजर ठेवावी लागेल. दर सहा महिन्यांनी किंवा वर्षभराने रक्कम किती झालीय, किती व्याज दराने वाढतेय किंवा कमी होतेय, यावर लक्ष ठेवावं लागेल. तुमच्या गुंतवणुकीचं मूल्य वाढत असेल, तर एसआयपी कायम ठेवा. काही कारणाने तुम्हाला असं वाटत असेल, की या गुंतवणुकीतून समाधानकारक परतावा मिळत नाहीये, तर तुम्ही गुंतवणूक दुसरीकडे करू शकता. असे काही फंड आहेत, ज्यात एसआयपीच्या माध्यमातून केवळ 100 ते 500 रुपयेही गुंतवता येऊ शकतात. ICICI प्रू टेक्नोलॉजी फंड - 5 वर्षांतला रिटर्न : 26.32% SIP साठी किमान रक्कम : 100 रुपये लाँच डेट : 1 जानेवारी 2013 लाँचनंतर रिटर्न : 22.45% अ‍ॅसेट : 938 कोटी (30नोव्हेंबर, 2020) एक्स्पेन्स रेशो : 1.91% (31ऑक्टोबर, 2020)

(वाचा - PPF Scheme:रोज 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 15 लाख,जाणून घ्या काय आहे योजना)

SBI टेक्नोलॉजी अपॉर्च्युनिटी फंड - 5 वर्षांतला रिटर्न : 22.33% SIP साठी किमान रक्कम : 500रुपये लाँच डेट : 1 जानेवारी 2013 लाँचनतरचा परतावा : 20.31% अ‍ॅसेट : 367 कोटी (30नोव्हेंबर, 2020) एक्स्पेन्स रेशो : 1.69% ( 31ऑक्टोबर, 2020)

(वाचा - Gold Price Today: सोने दरात पुन्हा वाढ, तर चांदीही वधारली; जाणून घ्या नवा भाव)

एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या स्कीममध्ये एक रकमी गुंतवणूक करण्याऐवजी दर महिन्याला ठराविक रकमेची गुंतवणूक करू शकता. ही रक्कम महिन्याला 100 रुपये इतकी कमीही असू शकते. तुम्ही मासिक उत्पन्न मिळवत असाल, तर तुम्हाला म्यच्युअल फंडच्या चांगल्या स्कीममध्ये गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो. त्या माध्यमातून तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवू शकता.
First published: