मराठी बातम्या /बातम्या /मनी /सरकारी 2 बँका देत आहेत सर्वोत्तम रिटर्न, फक्त 'या' योजनेत गुंतवा पैसे

सरकारी 2 बँका देत आहेत सर्वोत्तम रिटर्न, फक्त 'या' योजनेत गुंतवा पैसे

अनेकांना हा पैसा शेअर बाजारात गुंतवणं म्हणजे मोठी जोखीम वाटते. कारण तिथे तुमचे पैसे वाढण्याऐवजी कमीदेखील होण्याचा धोका असतो.

अनेकांना हा पैसा शेअर बाजारात गुंतवणं म्हणजे मोठी जोखीम वाटते. कारण तिथे तुमचे पैसे वाढण्याऐवजी कमीदेखील होण्याचा धोका असतो.

अनेकांना हा पैसा शेअर बाजारात गुंतवणं म्हणजे मोठी जोखीम वाटते. कारण तिथे तुमचे पैसे वाढण्याऐवजी कमीदेखील होण्याचा धोका असतो.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई : जर तुमच्याकडे काही अतिरिक्त पैसे असतील, तर तुम्ही त्याचे काय कराल? अनेकांना हा पैसा शेअर बाजारात गुंतवणं म्हणजे मोठी जोखीम वाटते. कारण तिथे तुमचे पैसे वाढण्याऐवजी कमीदेखील होण्याचा धोका असतो.

  गुंतवणुकीचा सर्वांत सुरक्षित आणि हमी असलेला रिटर्नचा पर्याय म्हणजे एफडी (Fixed Deposit) किंवा एखाद्या सरकारी बँकेची गुंतवणूक योजना. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यांच्या अशा काही गुंतवणूक योजना अतिशय लोकप्रिय आहेत.

  आज आम्ही तुम्हाला या बँकांच्या अशा दोन योजनांबाबत माहिती देणार आहोत, ज्यात पैसे गुंतवणं तुम्हाला फायदेशीर वाटेल. एसबीआय आणि पीएनबी या बँका लोकांच्या गरजेनुसार नवनवीन योजना सुरू करत असतात.

  बरेचदा काहीजणांना त्यांचे पैसे अशाप्रकारे गुंतवायचे असतात की त्यांना भविष्यात एकरकमी मोठी रक्कम मिळू शकेल. तर, काहींना दरमहा एक निश्चित रक्कम हवी असते. यासाठी एसबीआय बँकेची ‘एसबीआय वार्षिकी ठेव योजना’ (SBI annuity deposit scheme) आणि पीएनबी बँकेची ‘एफडी योजना’ या दोन अतिशय लोकप्रिय गुंतवणूक योजना आहेत.

  SBI ने ट्वीट करून ग्राहकांसाठी दिला मोठा अलर्ट

  या दोन्ही योजनांबाबत गुंतवणूकदारांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. तुम्हालाही दोन्हीपैकी कोणत्याही एका योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला या दोन्हीमधील फरक सांगत आहोत.

  तुम्हाला भविष्यात एकाचवेळी मोठी रक्कम हवी असेल, तर पीएनबी बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. तसंच ज्यांना सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन किंवा नियमित उत्पन्न म्हणून दरमहा एक छोटी रक्कम मिळवायची आहे, त्यांच्यासाठी एसबीआय वार्षिकी ठेव योजना अधिक फायदेशीर आहे.

  महिन्याला जमा होतील पैसे

  एसबीआय वार्षिकी ठेव योजनेत ग्राहक बँकेत एकरकमी पैसे जमा करून प्रत्येक महिन्याला व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळवू शकतात. बँक ठेवींवर दर तीन महिन्यांनी चक्रवाढ व्याजदराप्रमाणे व्याज काढते. यानंतर, तुमच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला व्याजाची एक निश्चित रक्कम जमा करते. या योजनेद्वारे, तुम्ही किमान महिन्याला 1,000 रुपये उत्पन्न मिळवू शकता.

  नोव्हेंबर महिन्यात 10 दिवस बँका बंद राहणार आजच चेक करा लिस्ट

  या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुमच्या अकाउंटमध्ये 29, 30 किंवा 31 तारखेला व्याजाची रक्कम जमा होते. तुम्ही 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.

  अशी आहे पीएनबी बँकेची एफडी योजना

  पीएनबी बँकेच्या एफडी योजनेमध्ये तुम्ही दीर्घकाळासाठी पैसे गुंतवू शकता. तुम्हाला मॅच्युरिटीवर मूळ रक्कम आणि व्याज एकत्र मिळेल. जे लोक मुलांचं शिक्षण, लग्न इत्यादी खर्चासाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही योजना खूप चांगला पर्याय आहे.

  पीएनबी बँकेनं नुकतंच त्यांच्या एफडी दरांमध्ये 75 बेसिस पॉइंट्सनं वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना 1 वर्षाच्या एफडीवर 6.30 टक्के, 1 ते 599 दिवस या कालावधीसाठी करण्यात येणाऱ्या एफडीवर 6.30 टक्के, 600 दिवसांच्या एफडीवर 7.00 टक्के, 601 दिवस ते 2 वर्ष या कालावधीसाठी केलेल्या एफडीवर 6.30 टक्के, 2 ते 3 वर्ष या कालावधीसाठी केलेल्या एफडीवर 6.25 टक्के व्याज मिळेल.

  याशिवाय 3 ते 5 वर्षांच्या एफडीवर 6.10 टक्के आणि 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर सुद्धा 6.10 टक्के व्याज मिळेल.

  एसबीआय व पीएनबी या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँका आहेत. या बँकेमध्ये करण्यात येणारी गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे येथे गुंतवणूक करणे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

  First published:

  Tags: Money, Pnb, SBI