Diwali 2022 Stock Pikcs: यंदाची दिवाळी खूप धमाकेदार असणार आहे. काही निवडक शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. यामध्ये ऑटो, बँकिंग, एफएमसीजी क्षेत्रातील समभागांचा समावेश आहे.
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे गौरांग शाह यांनी ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी महिंद्रा अँड महिंद्राला पुढील दिवाळीपर्यंत खरेदी करण्याचे मत दिले आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत या शेअरमध्ये 1800 रुपयांचं टार्गेट पाहायला मिळू शकतं.
AUM कॅपिटलचे राजेश अग्रवाल यांनी बजाज फिन्सर्व्हचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला. पुढील दिवाळीपर्यंत या शेअरवर 2100 रुपयांचे टार्गेट दिलं आहे. खरे तर कंपनीवर कोणतेही कर्ज नाही आणि त्याची अॅसेट क्वालिटी स्थिर आहे. (Moneycontrol)
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे हेमांग जानी यांनी विशाल एफएमसीजी स्टॉक आयटीसीमध्ये खरेदी करण्याचे मत दिले आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत 400 रुपयांचं टार्गेट देण्यात आलं आहे. त्याचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले लागले आहेत. (Moneycontrol)
“बाजार तज्ज्ञ सुदीप बंद्योपाध्याय यांनी इंडसइंड बँकेच्या शेअरवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. खरेदीवर पुढील दिवाळीपर्यंत1450 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. बँकेच्या कॉर्पोरेट आणि रिटेल या दोन्ही विभागांमध्ये कर्जात चांगली वाढ झाली आहे
बाजार तज्ज्ञ सुदीप बंद्योपाध्याय यांनी इंडसइंड बँकेच्या शेअरवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. खरेदीवर पुढील दिवाळीपर्यंत1450 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. बँकेच्या कॉर्पोरेट आणि रिटेल या दोन्ही विभागांमध्ये कर्जात चांगली वाढ झाली आहे.
Tracom Stock Brokers च्या पार्थिव शाह यांनी अंबुजा सिमेंटवरील खरेदीवर मत मांडलं आहे. अदानी समूहाने टेकओव्हर केल्यानंतर कंपनी विस्तार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरला तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Moneycontrol)
Sharekhan by BNP Paribas च्या संजीव यांनी दिवाळीची निवड म्हणून एपीएल अपोलो ट्यूब्सची निवड केली. संजीव होटा यांनी देशातील सर्वात मोठ्या पाईप उत्पादक कंपनीचे समभाग खरेदी करण्याचे मत दिले आहे. पुढील दिवाळीपर्यंत हा शेअर 1275 रुपयांचे लक्ष्य गाठू शकतो. (Moneycontrol)
आनंद राठी शेअर्सचे नरेंद्र सोळंकी यांनी टार्सन्स प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या शेअरमध्ये खरेदीचे मत मांडले आहे. नरेंद्र यांच्या मते, पुढच्या दिवाळीपर्यंत यात 974 रुपयांचे लक्ष्य पाहायला मिळू शकते.